Trip Plans : 'या' ट्रेनमध्ये बसून तुम्ही फिरू शकता 3 देश, जाणून घ्या कशी आहे प्रवासाची खासियत

Last Updated:

जगातला सगळ्यात लांब अंतराचा रेल्वे प्रवास कुठला? त्याला किती दिवस लागतात? आणि तो करायचा असेल तर कुठली रेल्वे पकडायची? हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर ही बातमी नक्की वाचा.

'या' ट्रेनमध्ये बसून तुम्ही फिरू शकता 3 देश
'या' ट्रेनमध्ये बसून तुम्ही फिरू शकता 3 देश
रेल्वेने प्रवास केला नाही किंवा रेल्वेचा प्रवास आवडत नाही असा माणूस विरळाच! राजधानी, डेक्कन ओडिसी अशा छान छान रेल्वे गाड्यांचा प्रवास एकदा तरी अनुभवावा असं कित्येकांचं स्वप्न असतं. वारसा स्थळांसारख्याच काही वारसा रेल्वे गाड्याही आपल्या आजूबाजूला असतात. पण जगातला सगळ्यात लांब अंतराचा रेल्वे प्रवास कुठला? त्याला किती दिवस लागतात? आणि तो करायचा असेल तर कुठली रेल्वे पकडायची? हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर ही बातमी नक्की वाचा.
जगातला सगळ्यात लांब रेल्वे प्रवास पूर्ण करायचा तर सात दिवस लागतात. रशियातल्या मॉस्को या शहरापासून ब्लादिवोस्तोक या शहरापर्यंत ही रेल्वे जाते. एवढ्या लांब पल्ल्याचा प्रवास करणारी जगातली ही पहिली रेल्वे आहे. हा पल्ला कापताना ती तीन देशांतील आणि थोड्याथोडक्या नव्हे तर सब्बल 86 शहरांमधून जाते. ‘ट्रान्स सायबेरियन ट्रेन’ म्हणून ही रेल्वे जगभरात ओळखली जाते. ती 10,214 किलोमीटरचं अंतर कापते. हे अंतर कापण्यासाठी ती 7 दिवस 20 तास 25 मिनिटांचा वेळ घेते. या प्रवासात ती 16 नद्यांची पात्रंही ओलांडते. हा रेल्वे प्रवास प्रवाशांना अनेक प्रकारच्या भूभागांतून घेऊन जातो. त्यामुळेच या प्रवासात कित्येक वेळा श्वास रोखून धरावे असे प्रसंगही प्रवाशांच्या वाट्याला येतात. दुसरीकडे डोळ्यांचं पारण फेडणारं निसर्गसौंदर्यही प्रवाशांना अनुभवायला मिळतं.
advertisement
ट्रेनचा इतिहास : 
ट्रान्स सायबेरियन रेल्वे 1916 मध्ये सुरु झाली. रशियातल्या मॉस्कोपासून ते ब्लादिवोस्तोकपर्यंत ही रेल्वे प्रवास करते. जगातला हा दुसरा सर्वांत लांब लोहमार्ग आहे. जंगल आणि पर्वतराजीतून ही रेल्वे प्रवास करते. रशियातल्या सायबेरिया या प्रांतात लोकवस्ती वाढवण्यात आणि त्या प्रांताचा सर्वांगीण विकास करण्यात या रेल्वेमार्गाचं अत्यंत महत्त्वाचं योगदान आहे.
advertisement
या देशांतून प्रवास : 
ही ट्रेन सात दिवसांच्या सफरीत प्रवाशांना तीन देशांचा प्रवास घडवते हे आम्ही तुम्हाला सांगितलंच. ब्लादिवोस्तोक, उलानबातर आणि बीजिंगमधून ही रेल्वे जाते. या मार्गावर 18 स्टेशन्स लागतात. इतर कुठल्याही रेल्वे प्रवासासारखंच या प्रवासातही आपल्याला कुठे उतरायचंय त्याचं बुकिंग आधीच करणं आवश्यक ठरतं. रेल्वे मार्गाप्रमाणे व्हिसाची प्रक्रियाही अर्थातच पूर्ण करावी लागते. रशियातून चीनपर्यंत जायचं असेल तर दोन्ही देशांचा व्हिसा प्रवाशांकडे असणं आवश्यक आहे.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Trip Plans : 'या' ट्रेनमध्ये बसून तुम्ही फिरू शकता 3 देश, जाणून घ्या कशी आहे प्रवासाची खासियत
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement