Suhagrat : 'सुहागरात' विषयी 99% लोकांना चुकीचा समज, पण खरा अर्थ काही वेगळाच

Last Updated:

या शब्दामागे एक खोल सामाजिक, भावनिक आणि सांस्कृतिक अर्थ दडलेला असतो. ज्याबद्दल ग्रंथांमध्ये ही लिहिलं आहे.

AI Generated Photo
AI Generated Photo
मुंबई : लग्नानंतर पहिली रात्र म्हणजे अनेकांचा असा समज आहे की ही फक्त रोमँटिक किंवा शारीरिक जवळीकची रात्र आहे, पण असं नाही. तर तिच्यामागे एक खोल सामाजिक, भावनिक आणि सांस्कृतिक अर्थ दडलेला असतो. ज्याबद्दल अनेकांना माहित नाही म्हणून लोकांनी त्याचा गैरसमज करुन ठेवला आहे. पण खरी गोष्ट काही वेगळी आहे.
सुहागरात म्हणजे काय?
‘सुहागरात’ हा शब्द दोन शब्दांनी बनलेला आहे: ‘सुहाग’ आणि ‘रात’.
सुहाग म्हणजे विवाहित स्त्रीचं सौभाग्य, तिच्या पतीशी असलेलं नातं आणि प्रेम, तर रात म्हणजे रात्र.
याचा अर्थ असा की, सुहागरात ही नवविवाहित जोडप्याची पहिली रात्र आहे, जी त्यांच्या वैवाहिक जीवनाची नवीन सुरुवात दर्शवते.
भारतीय परंपरेत सुहागरात फक्त शारीरिक जवळीकापुरती मर्यादित नाही. ही रात्र एकमेकांना समजून घेण्याची, संवाद साधण्याची आणि विश्वास निर्माण करण्याची संधी आहे. प्राचीन ग्रंथांमध्येही या रात्रीचे महत्त्व अधोरेखित केले गेलं आहे.
advertisement
सुहागरातशी निगडीत काही पारंपरिक रीतिरिवाज आहेत. यामध्ये नववधूला सोळा श्रृंगारात सजवले जाते, फुलांनी सजवलेली सेज तयार केली जाते, मिठाई आणि दूधाचा ग्लास ठेवला जातो. या छोट्या छोट्या गोष्टी नवदांपत्यात प्रेम, आदर आणि आपुलकी निर्माण करतात.
आजकाल अनेक जोडपी ही रात्र आपल्या सोयीप्रमाणे घालवतात. एकमेकांच्या संमतीने आणि सहजतेने केलेली पहिली रात्र अधिक अर्थपूर्ण ठरते.
advertisement
सुहागरात ही फक्त एक रात्र नाही, तर नव्या प्रवासाची सुरुवात आहे. प्रेम, समजूत आणि आयुष्यभर एकत्र राहण्याचे वचन याची प्रतीकात्मक रात्र. त्यामुळे 'सुहागरात' फक्त शारीरिक नाही, तर मन, संस्कृती आणि नात्याचा देखील महत्त्वाचा भाग आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Suhagrat : 'सुहागरात' विषयी 99% लोकांना चुकीचा समज, पण खरा अर्थ काही वेगळाच
Next Article
advertisement
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी,  सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हणाले...
तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण
  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

View All
advertisement