Interesting Facts : पुरुषांचा दुष्काळ! महिला तासांवर ऑर्डर करतात पती; कुठे सुरू आहे हा अजब ट्रेंड?

Last Updated:

Husband Rent Trend : तुम्ही कधी अशा देशाबद्दल ऐकले आहे का जिथे महिला घरकाम करण्यासाठी पतींना कामावर ठेवतात? हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, असं कोण करतं असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. पण ही परिस्थिती सध्या एका देशातील महिलांवर आली आहे.

जोडीदाराच्या शोधात महिलांचे स्थलांतर
जोडीदाराच्या शोधात महिलांचे स्थलांतर
मुंबई : लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने आपल्याकडे अनेक तरुणांचे विवाह होत नाहीये, या विषयावरून सोशल मीडियावर रिल्स आणि मिम्स बनत आहेत. परंतु जगामध्ये एक देश असाही आहे जिथे महिलांना घरगुती कामासाठी आणि देखभालीची छोटी-मोठी कामे करण्यासाठी चक्क 'भाड्याने पती' बोलावावे लागतात. युरोपातील लातविया (Latvia) या देशात सध्या ही आश्चर्यकारक पद्धत चर्चेचा विषय ठरली आहे. येथील पुरुषांची संख्या अत्यंत वेगाने कमी होत असल्यामुळे घर आणि गृहस्थीशी संबंधित अनेक कामे पूर्ण करण्यासाठी महिलांना तात्पुरत्या स्वरूपात पुरुष मदतनीसांची सेवा घ्यावी लागत आहे. लातवियामध्ये नेमका हा 'जेंडर इम्बॅलन्स' का निर्माण झाला आणि त्याचा तेथील सामाजिक जीवनावर काय परिणाम होत आहे, याबद्दल जाणून घेऊया.
'पती एका तासासाठी' संकल्पना
न्यूयॉर्क पोस्टच्या एका अहवालानुसार, लातवियामध्ये पुरुषांची कमतरता इतकी वाढली आहे की, महिलांना घरच्या दुरुस्तीची आणि तांत्रिक कामांसाठी 'भाड्याने पती' बोलावावे लागतात. येथे महिलांची संख्या पुरुषांपेक्षा सुमारे 15 टक्के अधिक आहे. यामुळे लिंग गुणोत्तराचे मोठे असंतुलन निर्माण झाले आहे. ज्या कामांसाठी पुरुषांची मदत लागते, जसे की प्लंबिंग, कारपेंट्री, टीव्ही इन्स्टॉलेशन किंवा सामान्य घरातील देखभाल ती पूर्ण करण्यासाठी महिला थोड्या वेळेसाठी पुरुष 'हेल्पर्स'ची सेवा घेतात.
advertisement
सेवा पुरवणारे विशेष प्लॅटफॉर्म
'कोमांडा 24' सारखे प्लॅटफॉर्म येथे "मॅन विथ गोल्डन हँड्स" या नावाने ही सेवा पुरवतात. त्याचप्रमाणे Remontdarbi.lv सारख्या वेबसाइट्सवर पेंटिंग, घरातील दुरुस्ती आणि देखभालीसाठी महिला फोन करून 'एका तासासाठी पती' हायर करतात.
जोडीदाराच्या शोधात महिलांचे स्थलांतर
लातवियामधील हे लिंग असंतुलन केवळ तरुणांमध्येच नाही, तर वृद्ध लोकसंख्येमध्येही आहे. वर्ल्ड ॲटलसच्या एका अहवालानुसार, लातवियामध्ये 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जवळपास दुप्पट आहे. या गंभीर असंतुलनामुळे महिलांना योग्य जीवनसाथी शोधणे कठीण होत आहे. यामुळे त्यांच्या नात्यांमधील आव्हानेही वाढत आहेत. या लिंग असमानतेमुळे दैनंदिन जीवनात आणि कामाच्या ठिकाणी पुरुषांची कमतरता स्पष्टपणे जाणवते. त्यामुळे अनेक महिला चांगल्या जोडीदाराच्या शोधात परदेशातही स्थलांतर करत आहेत.
advertisement
लातवियापुरता मर्यादित नाही ट्रेंड
'भाड्याने पती' ही संकल्पना केवळ लातवियापर्यंत मर्यादित नाही. 2022 मध्ये युकेमध्ये लॉरा यंग ही महिला खूप चर्चेत आली होती. तिने तिच्या पतीला म्हणजेच जेम्सला घरातील छोटी-मोठी कामे करण्यासाठी भाड्याने पाठवायला सुरुवात केली होती. जेम्स यांनी सुरू केलेल्या या व्यवसायाचे नाव "रेंट माय हँडी हसबंड" असे आहे. 42 वर्षीय जेम्स एका तासासाठी सुमारे 44 डॉलर आणि संपूर्ण दिवसासाठी 280 डॉलर शुल्क आकारतात. यामध्ये पेंटिंग, डेकोरेशन, टाइल्स लावणे, कार्पेट बसवणे आणि इतर कामे समाविष्ट असतात. ही सेवा इतकी लोकप्रिय झाली की त्यांना अनेक कामे नाकारावी लागली होती.
advertisement
लातवियामधील हा ट्रेंड, लिंग गुणोत्तराचे असंतुलन आणि आधुनिक जीवनातील घरगुती मदतीची वाढती गरज या दोन्ही समस्यांना अधोरेखित करतो. या देशात पुरुषांची कमतरता आहे आणि ती कमतरतात भरून काढण्यासाठी महिला पुरुषांना भाड्याने कामावर बोलवतात.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Interesting Facts : पुरुषांचा दुष्काळ! महिला तासांवर ऑर्डर करतात पती; कुठे सुरू आहे हा अजब ट्रेंड?
Next Article
advertisement
Silver Price News: चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

View All
advertisement