Tips to avoid motion Sickness: ‘या’ कारणामुळे नको वाटतो प्रवास, काळजी नका करूत, वापरा ‘या’ सोप्या टिप्स, बिनधास्त करा प्रवास
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Tips to avoid motion Sickness: फिरायला जाणं हे प्रत्येकाला आवडत असलं तरीही अनेकांना गाडीत बसल्यावर गाडी लागण्याचा त्रास होतो. मात्र आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टीप्स् सांगणार आहोत, ज्यामुळे गाडी लागण्याचा त्रास कमी होऊ शकतो.
मुंबई: वर्षांचा शेवट जवळ येत चाललाय. अशातच सुट्ट्यांमध्ये फिरायला कुठे जायचं यावरून सगळ्यांचं प्लॅनिंग सुरू झालंय. फिरायला जाणं हे प्रत्येकाला आवडत जरी असलं तरीही अनेकांना गाडीत बसल्यावर गाडी लागण्याचा किंवा सोप्या भाषेत सांगायाचं तर उलटीचा त्रास होतो. मात्र आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टीप्स् सांगणार आहोत, ज्यामुळे गाडी लागण्याचा त्रास कमी होऊ शकतो.अनेकांना प्रवासादरम्यान त्रास होतो. काहींना बस लागते तर काहींना कारमध्ये मागे बसल्यावर त्रास होतो किंवा काहींना घाटातून प्रवास करताना पोटात मळमळ होऊ लागते. याला वैद्यकीय भाषेत मोशन सिकनेस (Motion Sickness) असं म्हणतात. बरेच जण तर प्रवास करण्यापूर्वी उलटी न होण्याची औषधं घेतात किंवा उपाशीपोटी प्रवास करतात. मात्र अशामुळे ॲसिडिटीचा त्रास वाढू शकतो. आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मानण्यानुसार जर प्रवासाच्या एक तास आधी आलं, वेलची, पुदीना, लवंग, तुळशीचं पान यांचं सेवन केल्यास तुमचा गाडी लागण्याचा आजारात कमी होऊ शकतो.

मनात 'तो' विचार नको
मोशन सिकनेसचा त्रास किंवा गाडी लागण्याचा त्रास हा बऱ्याचदा सतत विचार केल्यामुळे होतो. त्यामुळे गाडीत बसताना तुम्हाला त्रास होणार आहे असा विचार डोक्यात आणू नका. नाहीतर तुम्हाला निश्चित त्रास होऊ शकतो. आधी सांगितल्याप्रमाणे काही व्यक्तींना कारमध्ये पुढे बसल्यावर त्रास होत नाही. मात्र तीच व्यक्ती त्याच कारमध्ये मागे बसली तर त्रास होतो. तुम्ही गाडीत मागे बसला असाल तर तुम्हाला काही झालं नाही किंवा होणार नाही असा विचार करा. याशिवाय तुम्ही स्वत:ला गप्पांमध्ये गुंतवून ठेवा जेणेकरून गाडी लागण्याचा विचार तुमच्या मनात येणार नाही आणि तुम्हाला त्रासापासून आराम मिळून तुमचा प्रवास सुखकर आणि आनंदी होईल.
advertisement
मोशन सिकनेस टाळाण्यासाठी काही टिप्स
- प्रवास करण्यापूर्वी खूप खाऊ नये. यामुळे अपचन होऊन उलट्या होण्याची भीती असते.
- ट्रेन, बस किंवा व्हॅनमधून प्रवास करत असाल तर वाहन ज्या दिशेने जात असेल त्याच दिशेने तोंड करून बसा, विरुद्ध दिशेने बसल्यास चक्कर येऊ शकते.त्यामुळे गरगरल्यासारखं वाटून उलटीचा त्रास होऊ शकतो.
- प्रवास करताना लवंग आणि वेलची सोबत ठेवा. जेव्हा तुम्हाला मळमळल्या सारखं वाटेल तेव्हा लवंग चावून खा. लवंगाच्या औषधी गुणधर्मांमुळे तुम्हाला आराम वाटेल.
- तुम्हाला कोणतीही गाडी लागण्याचा त्रास असेल तर आलं, पुदिना, लिंबू सोबत ठेवा. पुदीना आणि लिंबाच्या वासामुळे तुम्हाला आराम जाणवेल. यामुळे उलटी येण्याची भावना कमी होईल.
- जर तुम्हाला भल्या पहाटे प्रवास करायचा असेल तर रात्री झोपताना जिरे, धणे आणि बडीशेप पाण्यात भिजवून ठेवा. आणि सकाळी प्रवासापूर्वी खा म्हणजे ॲसिडिटीचा त्रास न होता गाडी लागण्याच्या समस्येपासून आराम मिळेल.
- मोशन सिकनेसचा त्रास असलेल्या व्यक्तींनी प्रवासात कधीही पुस्तके वाचू किंवा मोबाईल बघू नये असं केल्याने डोकं गरगरल्या सारखं वाटून चक्कर येऊ शकते.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 12, 2024 6:10 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Tips to avoid motion Sickness: ‘या’ कारणामुळे नको वाटतो प्रवास, काळजी नका करूत, वापरा ‘या’ सोप्या टिप्स, बिनधास्त करा प्रवास