advertisement

ACचे चुकीचे Temperature म्हणजे संकट; 20°C - 28°C दरम्यानचे तापमान देते शरीर,मनाला आराम- आर्थिक गणितपण समजून घ्या

Last Updated:

New AC Temperature Rules: ऊर्जा कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी आणि विजेच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच संपूर्ण भारतात एअर कंडिशनर्ससाठी एक निश्चित तापमान मर्यादा बंधनकारक करण्यात येणार आहे. म्हणजेच, AC फक्त 20°C ते 28°C या तापमानाच्या मर्यादेतच चालवावे लागणार आहे.

News18
News18
उन्हाळ्यात घरात पोचल्यावर एक गोष्ट हमखास होते. पटनक AC सुरू होतो आणि लगेच रिमोट हातात येतो. मग बोट आपसूकच 16–18 डिग्रीवर जातं… “जरा थंड लागतंय!” म्हणत आपण निवांत होतो. पण खरं सांगायचं झालं तर ही सवय आपल्यासाठीही चांगली नाही. आणि AC साठी तर अजिबातच नाही.
भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या शिफारशी प्रमाणे आणि तज्ज्ञांच्या मते, AC चं तापमान 20°C ते 28°C च्या दरम्यान ठेवणं योग्य ठरतं. आणि त्यामागे ठोस अशी कारणं आहेत. ऊर्जेची बचत आणि विजेचा वापर कमी करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी नवीन नियमावली जाहीर केली आहे. या नियमानुसार लवकरच भारतातील सर्व वातानुकूलित यंत्रे (AC) केवळ 20°C ते 28°C या तापमानादरम्यानच चालवणे बंधनकारक असेल. जाणून घेऊयात निर्णयामागची कारणे आणि त्याचे परिणाम...
advertisement
1) शरीराला कधी आराम मिळतो?
आपण AC मध्ये थेट 16–18 डिग्रीवर जातो. पण ते आपल्या शरीराला धक्का देणारं तापमान असतं. अचानक थंड हवेमुळे अंग आकडतं, मानेत-कंबरित जडपणा येतो, डोकं दुखतं किंवा घशाचा त्रास होतो. BEE (Bureau of Energy Efficiency) नुसार, भारतीय हवामान आणि शरीररचनेनुसार 24–26 डिग्रीचं तापमान आरामदायक मानलं जातं. (स्रोत: BEE Advisory, Govt. of India, 2018)
advertisement
2) बिलाचा सापळा 
AC चालवताना आपण जितकं तापमान कमी करतो, तितकी जास्त वीज वापरली जाते. सरकारच्या माहितीनुसार, AC चं तापमान दर 1 डिग्रीने कमी केल्यास 6% वीज अधिक खर्च होते. म्हणजेच जर तुम्ही 24°C ऐवजी 20°C वर AC चालवत असाल तर जवळपास 24% वीज जास्त खर्च होते आणि तेवढंच बिलही वाढतं. (स्रोत: Ministry of Power, India)
advertisement
3) पर्यावरणाचं काय?
जितकी जास्त वीज वापरू, तितका कार्बन उत्सर्जन वाढतो. एकट्या भारतात कोट्यवधी AC चालतात. जर प्रत्येकाने थोडं तापमान वाढवलं, तर मोठ्या प्रमाणावर इंधन आणि ऊर्जा वाचू शकते. International Energy Agency (IEA) च्या अहवालात स्पष्ट सांगितलं आहे की, घरगुती AC वापर जर जबाबदारीने केलं तर हवामान बदलावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
advertisement
4) AC ला पण दम लागतो!
तापमान खूपच कमी ठेवल्यास AC चा compressor सतत चालू-थांब चालू-थांब करत राहतो. यामुळे AC लवकर बिघडतो, फ्रीजिंग प्रॉब्लेम्स येतात आणि वारंवार सर्व्हिसिंग करावी लागते. 24-26 डिग्रीवर चालवलेला AC शांत, स्थिर आणि दीर्घकाळ टिकणारा असतो.
5) कधी किती डिग्री योग्य?
वेळ आणि ठिकाणानुसार तापमान बदलायला हरकत नाही. हे लक्षात ठेवा:
advertisement
योग्य तापमान (°C)
> घरात दिवसा: 24–२५
> ऑफिसमधील कामासाठी: 22–24
> झोपताना: 25–26
> पावसाळ्याच्या दिवसात:26–28
शेवटी एक साधी गोष्ट लक्षात ठेवा…
AC म्हणजे ‘फ्रीज’ नव्हे. त्याचा हेतू आहे शरीराला आणि मनाला आराम मिळवून देणं, नुसतं थंडीने कुडकुडवणं नव्हे. तुमचं आरोग्य, वीजबचत, पर्यावरण आणि AC ची आयुष्य हे सगळं फक्त एका निर्णयावर ठरतं. त्यासाठी AC चं तापमान 24°C ते 26°C वर ठेवा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
ACचे चुकीचे Temperature म्हणजे संकट; 20°C - 28°C दरम्यानचे तापमान देते शरीर,मनाला आराम- आर्थिक गणितपण समजून घ्या
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement