नॉर्मल डिलिव्हरी हवी आहे? 38 व्या आठवड्यानंतर 'हे' 2 व्यायाम ठरू शकतात गेम चेंजर; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
- Published by:Devika Shinde
Last Updated:
बहुतांश महिला 'नॉर्मल डिलिव्हरी'लाच प्राधान्य देतात. याचं मुख्य कारण म्हणजे नॉर्मल डिलिव्हरीनंतर शरीर लवकर रिकव्हर होतं आणि आई पूर्वीसारखी सक्रिय होऊ शकते. पण नॉर्मल डिलिव्हरी ही केवळ नशिबाची गोष्ट नसून, ती तुमच्या शरीराच्या तयारीवर आणि योग्य व्यायामावर अवलंबून असते.
मुंबई : प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात 'आई' होण्याचा प्रवास हा अत्यंत सुखद पण तितकाच आव्हानात्मक असतो. नऊ महिने नऊ दिवस पोटात एका जिवाला वाढवताना मनात अनेक विचार सुरू असतात. त्यातलाच एक सर्वात महत्त्वाचा विचार म्हणजे "डिलिव्हरी नॉर्मल होईल ना?" आजकालच्या जीवनशैलीत सिझेरियन (C-Section) होण्याचे प्रमाण वाढले असले, तरी आजही बहुतांश महिला 'नॉर्मल डिलिव्हरी'लाच प्राधान्य देतात. याचं मुख्य कारण म्हणजे नॉर्मल डिलिव्हरीनंतर शरीर लवकर रिकव्हर होतं आणि आई पूर्वीसारखी सक्रिय होऊ शकते. पण नॉर्मल डिलिव्हरी ही केवळ नशिबाची गोष्ट नसून, ती तुमच्या शरीराच्या तयारीवर आणि योग्य व्यायामावर अवलंबून असते.
नॉर्मल डिलिव्हरीसाठी गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात नेमके काय करावे? यावर मुंबईतील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. आशिक अली (Dr. Aashiq Ali) यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे.
38 व्या आठवड्यानंतर 'हे' दोन व्यायाम आहेत महत्त्वाचे
डॉ. आशिक अली यांच्या मते, जर तुमची प्रेग्नेंसी सुरक्षित असेल आणि कोणतेही कॉम्प्लिकेशन्स नसतील, तर 38 व्या आठवड्यानंतर तुम्ही दोन विशेष व्यायाम प्रकारांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
advertisement
1. डक वॉक (Duck Walk):
हा व्यायाम करताना एखाद्या बदकाप्रमाणे खाली बसून चालण्याचा प्रयत्न केला जातो.
फायदा: यामुळे मांड्या, कंबर आणि पेल्विक ( ओटीपोटाच्या खालचे) स्नायू मजबूत होतात. पेल्विक एरियामध्ये लवचिकता वाढल्यामुळे बाळाला खाली सरकण्यास आणि बाहेर येण्यास मदत होते. लेबर पेन दरम्यान येणारा दबाव सहन करण्याची ताकद यामुळे मिळते.
2. बटरफ्लाय स्ट्रेच (Butterfly Stretch):
जमिनीवर बसून दोन्ही पाय दुमडून तळवे एकमेकांना जोडणे आणि गुडघे फुलपाखराच्या पंखांप्रमाणे हलवणे याला बटरफ्लाय स्ट्रेच म्हणतात.
advertisement
फायदा: या व्यायामामुळे पेल्विक फ्लोअरचे स्नायू रिलॅक्स होतात आणि कमरेतील ताण कमी होते. यामुळे शरीराच्या खालच्या भागात रक्तभिसरण सुधारते आणि बाळ योग्य स्थितीत येण्यास मदत होते. शारीरिक फायद्यांसोबतच हा व्यायाम मानसिक शांतता देण्यासही मदत करतो.
केवळ व्यायाम पुरेसा नाही; या गोष्टींचीही ठेवा काळजी
डॉक्टरांच्या मते, केवळ व्यायाम करून चालणार नाही, तर तुम्हाला तुमच्या संपूर्ण जीवनशैलीवर लक्ष द्यावे लागेल. तुमच्या आहारात प्रोटीन, लोह (Iron), कॅल्शियम आणि फायबरचे प्रमाण योग्य असावे. शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका. बाळाची स्थिती, त्याचे वजन आणि तुमची प्रकृती समजून घेण्यासाठी नियमित चेकअप करणे अनिवार्य आहे. तणावमुक्त राहणे हा नॉर्मल डिलिव्हरीसाठी एक मोठा मंत्र आहे. तुम्ही जितक्या सकारात्मक राहाल, तितकी तुमची डिलिव्हरी सुलभ होण्याची शक्यता वाढते.
advertisement
डॉ. अली आवर्जून सांगतात की, प्रत्येक महिलेची प्रेग्नेंसी ही वेगळी असते. त्यामुळे कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. जर तुम्हाला जास्त रक्तस्त्राव, तीव्र वेदना, पाण्याची पिशवी फुटणे किंवा बाळाची हालचाल कमी होणे असे कोणतेही 'डेंजर साइन' दिसले, तर तातडीने रुग्णालयात धाव घ्या.
योग्य आहार, सकारात्मक विचार आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने केलेला व्यायाम तुमच्या नॉर्मल डिलिव्हरीचा मार्ग सोपा करू शकतो.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 02, 2026 3:56 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
नॉर्मल डिलिव्हरी हवी आहे? 38 व्या आठवड्यानंतर 'हे' 2 व्यायाम ठरू शकतात गेम चेंजर; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला










