तुमच्याही कुंडीत लावलेलं रोप सुकून जातंय? ही एक ट्रिक वापरताच होईल हिरवंगार
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
परसबाग किंवा टेरेसमधली रोपं निरोगी आणि हिरवीगार राहावीत यासाठी कोणते उपाय करावेत, ते सविस्तर जाणून घेऊ या.
घर आणि घराचा परिसर सकारात्मक राहावा, सुंदर दिसावा यासाठी आपण टेरेस किंवा परसबागेत विविध प्रकारची रोपं लावतो. लागवड केल्यावर या रोपांची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. रोपांची काटेकोर काळजी घेतली, तर ती दीर्घ काळ टिकतात आणि हिरवीगार राहतात. बऱ्याचदा रोपं लवकर खराब होतात, अशी तक्रार अनेक जण करतात. यामागे काही कारणं असू शकतात. रोपांची योग्य निगा राखली तर रोपं कायम ताजीतवानी दिसतात. बऱ्याचदा काही कारणांमुळे रोपं सुकतात, खराब होतात. लावलेली रोपं हिरवीगार राहावीत यासाठी काही उपाय करणं गरजेचं असतं. रोपं चांगली राहिली तर घराचं सौंदर्य आणखी खुलतं. परसबाग किंवा टेरेसमधली रोपं निरोगी आणि हिरवीगार राहावीत यासाठी कोणते उपाय करावेत, ते सविस्तर जाणून घेऊ या.
घराच्या सजावटीसाठी अनेक जण वेगवेगळ्या प्रकारची रोपं लावतात. कारण यामुळे घर आणि परिसरात सकारात्मक ऊर्जा राहते. रोपं निरोगी आणि हिरवीगार राहण्यासाठी काही उपाय गरजेचे असतात. हे उपाय सहजसोपे असून, ते केल्यास तुमची परसबाग कायम हिरवीगार राहते.
advertisement
जेव्हा कोणत्याही कारणामुळे रोपांची पानं सुकतात, तेव्हा ती लगेच कापून टाकावी. कारण ही पानं रोपातले पोषक घटक घेतात. त्यामुळे रोपांवरची इतर पानं सुकू लागतात. त्यामुळे सुकलेली पानं तातडीनं काढली तर रोप हिरवंगार राहतं.
रोप सुकलं असेल तर त्याला पाणी देणं गरजेचं असतं. त्यामुळे रोपांना नियमित पाणी घालावं. जसं माणसाला पाण्याची सतत गरज असते, तसंच रोपांनादेखील सातत्यानं पाणी देणं आवश्यक आहे; पण रोपांना प्रमाणापेक्षा जास्त पाणी देणं टाळा, अन्यथा त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
advertisement
रोपं हिरवीगार राहावीत, यासाठी दर्जेदार मातीचा वापर गरजेचा आहे. यासाठी मोठ्या झाडांखालची माती रोपांना द्यावी. रोपवाटिकेतून खत आणून ते रोपांना घालावं. यामुळे रोपांना नवसंजीवनी मिळेल. रोपं दीर्घ काळ टिकतील आणि हिरवीगार राहतील. यामुळे साहजिकच घराचं सौंदर्य तर खुलेलच. त्यासोबत सकारात्मकतादेखील वाढेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 04, 2024 11:28 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
तुमच्याही कुंडीत लावलेलं रोप सुकून जातंय? ही एक ट्रिक वापरताच होईल हिरवंगार