advertisement

Anaemia : नेहमी थकल्यासारखं वाटतं ? दिवसभर थकवा वाटतो ? थकवा येण्यामागची प्रमुख कारणं समजून घेऊया

Last Updated:

रक्तातील साखरेची पातळी सामान्य असूनही, एखाद्या व्यक्तीला दिवसभर जडपणा जाणवतो आणि अशक्त वाटतं. असं तुम्हालाही जाणवत असेल, तर शरीर काहीतरी वेगळेच सिग्नल देण्याचा प्रयत्न करत आहे असं समजायला हवं. साखरेची पातळी सामान्य असतानाही सतत थकवा जाणवण्यामागे अनेक शारीरिक आणि मानसिक कारणं असू शकतात.

News18
News18
मुंबई : धावपळ, श्रमानं येणारा थकवा समजू शकतो. पण बहुतांश वेळा, थकवा हे रक्तातील साखरेच्या पातळीत वाढ होण्याचं सर्वात सामान्य लक्षण मानलं जातं.
रक्तातील साखरेची पातळी सामान्य असूनही, एखाद्या व्यक्तीला दिवसभर जडपणा जाणवतो आणि अशक्त वाटतं. असं तुम्हालाही जाणवत असेल, तर शरीर काहीतरी वेगळेच सिग्नल देण्याचा प्रयत्न करत आहे असं समजायला हवं. साखरेची पातळी सामान्य असतानाही सतत थकवा जाणवण्यामागे अनेक शारीरिक आणि मानसिक कारणं असू शकतात.
advertisement
अशक्तपणा - थकवा येण्याचं सर्वात सामान्य कारण म्हणजे शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असते. रक्तात लोह किंवा व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असते तेव्हा शरीराच्या अवयवांना पुरेसा ऑक्सिजन मिळू शकत नाही. यामुळे साध्या कामांमधेही थकवा येऊ शकतो. भारतात, महिला आणि शाकाहारी लोकांमध्ये ही समस्या अधिक आढळते.
थायरॉईड समस्या - थायरॉईड ग्रंथी आपल्या शरीरातील चयापचय नियंत्रित करतात. हायपोथायरॉईडीझम असेल तर तुमची ग्रंथी आवश्यक प्रमाणात हार्मोन्स तयार करत नाही. या स्थितीत, तुमचं साखरेचं प्रमाण सामान्य राहू शकते, पण तुमचं शरीर सुस्त होतं आणि स्नायू दुखतात आणि थकवा जाणवतो.
advertisement
व्हिटॅमिन डी आणि बी12 ची कमतरता - आजच्या घरातील जीवनशैलीमुळे व्हिटॅमिन डीची कमतरता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हे जीवनसत्व हाडांच्या आरोग्यासाठी तसंच उर्जेच्या पातळीसाठी आवश्यक आहे. व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे थकवा देखील येऊ शकतो. या दोन सूक्ष्म पोषक घटकांच्या कमतरतेमुळे शरीर पोकळ आणि थकलेलं वाटू शकतं.
ताण आणि मानसिक आरोग्य - शरीर आणि मन एकमेकांशी जोडलेले आहेत. जास्त मानसिक ताण, चिंता किंवा नैराश्य यामुळे शरीराची ऊर्जा कमी होते. मानसिकदृष्ट्या थकलेले असता तेव्हा कॉर्टिसोलची पातळी वाढते, जी शारीरिक थकव्याच्या रुपात दिसते. याला मानसिक थकवा म्हणतात.
advertisement
झोपेची गुणवत्ता आणि डिहायड्रेशन - 7-8 तास झोपल्यानंतरही थकवा जाणवत असेल तर तुमच्या झोपेची गुणवत्ता खराब असू शकते. स्लीप एपनियासारख्या समस्यांमुळे रात्री श्वास घेण्यास त्रास होतो, ज्यामुळे सकाळी उठल्यानंतरही शरीर थकलेलं राहतं. शिवाय, डिहायड्रेशनमुळे म्हणजे पुरेसं पाणी न प्यायल्यामुळेही थकवा येऊ शकतो.
advertisement
रक्तातील साखरेची पातळी सामान्य झाल्यानंतरही थकवा कायम राहिला तर:
संपूर्ण शरीराची तपासणी करा- थायरॉईड, आयर्न प्रोफाइल आणि व्हिटॅमिन पातळी तपासा.
आहारावर लक्ष केंद्रित करा - प्रथिनं, हिरव्या भाज्यांचा समावेश करा आणि भरपूर पाणी प्या.
शारीरिक हालचाली - हलक्या व्यायामामुळे शरीरात एंडोर्फिन वाढतात आणि थकवा कमी होतो.
कॅफिन नियंत्रण - जास्त चहा किंवा कॉफी पिण्यानं उर्जेची पातळी अचानक कमी होऊ शकते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Anaemia : नेहमी थकल्यासारखं वाटतं ? दिवसभर थकवा वाटतो ? थकवा येण्यामागची प्रमुख कारणं समजून घेऊया
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement