advertisement

राज्यसभा निवडणुकीच्या इतिहासात महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं घडलं, शरद पवारांच्या अर्ज दाखल पण...

Last Updated:

 शरद पवारांचा अर्ज भरण्यासाठी जयंत पाटील,  हर्षवर्धन सपकाळ, सुप्रिया सुळे, संजय राऊत आणि इतर मविआ नेते उपस्थित होते.

News18
News18
मुंबई: राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात ७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे आता  राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. 7 जागांसाठी केवळ 7 उमेदवारांचे अर्ज आल्यानं निवडणूक बिनविरोध होणार आहे. पण, या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा एक प्रकार घडला आहे. ६ उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे जाऊन अर्ज भरला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी घरी जाऊन अर्ज भरला आहे. राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं घडलं आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी  शरद पवार, ज्योती वाघमारे आणि पार्थ पवारांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान अर्जांची छाननी झाल्यानंतर औपचारीक घोषणा होण्याची शक्यता आहे. तर भाजपकडून विनोद तावडे, रामदास आठवले, माया ईवनाते आणि रामराव वडकुतेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजप उमेदवारांचा अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे इतर नेते हजर होते. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ज्योती वाघमारेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
advertisement
घरी पोहोचले निवडणूक अधिकारी
तर महाविकास आघाडीकडून शरद पवारांचा अर्ज दाखल केला आहे. शरद पवार हे अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात येऊ शकले नाही. तब्येतीच्या कारणास्तव शरद पवार हे अर्ज दाखल करण्यासाठी आले नाही. निवडणूक अधिकाऱ्यांनी घरी जाऊन निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली आहे.  जे जे हॉस्पिटलचे अधीक्षक यांनी यावेळी शपथ दिली. आजारी व्यक्ती अर्ज दाखल करण्यासाठी आला नाही, अशी ही राज्यातील पहिलीच घटना आहे.   शरद पवारांचा अर्ज भरण्यासाठी जयंत पाटील,  हर्षवर्धन सपकाळ, सुप्रिया सुळे, संजय राऊत आणि इतर मविआ नेते उपस्थित होते. त्याचबरोबर राष्ट्रवादीकडून पार्थ पवारांनी उमेदवारी अर्ज भरताना मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही उपस्थित होत्या.
advertisement
शिवसेनेकडून धक्कातंत्र, ज्योती वाघमारेंना अर्ज 
अनेक चर्चानंतर अखेर शिवसेनेच्या राज्यसभेच्या उमेदवारानं आपला अर्ज दाखल केला. शिवसेनेकडून राज्यसभेसाठी ज्योती वाघमारे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.. शिवसेनेनं दोन उमेदवार दिले असते तर राज्यसभा निवडणुकीसाठी रंगत निर्माण झाली असती. पण शिवसेनेनं ज्योती वाघमारेंच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे आता राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
advertisement
राज्यसभा निवडणूक बिनविरोध 
विनोद तावडे उमेदवार, भाजप
रामदास आठवले उमेदवार, भाजप
माया इवनाते उमेदवार, भाजप
रामराव वडकुते उमेदवार, भाजप
ज्योती वाघमारे उमेदवार, शिवसेना
दरम्यान, राज्यसभा निवडणुकीसाठी दोन अपक्ष अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मात्र, सूचक म्हणून १० आमदारांच्या स्वाक्षरी नसल्याने हे अर्ज छाननी मध्ये बाद होतील, असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे  परिणामी ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राज्यसभा निवडणुकीच्या इतिहासात महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं घडलं, शरद पवारांच्या अर्ज दाखल पण...
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement