Dahihandi 2025: गोकुळाष्टमीला आपल्या घरीच बनवा गोपाळकाला, अवघ्या 5 मिनिटांत रेसिपी तयार
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Dahihandi 2025: गोकुळाष्टमीला दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दहीहंडीसाठी श्रीकृष्णाचा आवडता गोपाळकाला बनवला जातो.
छत्रपती संभाजीनगर : कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याकडे दहीहंडी फोडली जाते. दहीहंडी म्हणलं की आपल्याकडे आवर्जून श्रीकृष्णाचा आवडता पदार्थ म्हणून गोपाळकाला बनवला जातो. दहीहंडी फोडल्यानंतर सर्वांना प्रसाद म्हणून गोपाळकाला दिला जातो. मंदिरात बनवला जाणारा गोपाळकाला तुम्ही आपल्या घरी देखील बनवू शकता. याचीच सोपी रेसिपी डॉ. प्रज्ञा तल्हार यांनी सांगितली आहे.
गोपाळकाला बनवण्यासाठी साहित्य
गोपाळकाला बनवण्यासाठी पोहे, लाह्या, डाळिंब, सफरचंद (तुम्ही कुठलंही फळ वापरू शकता.) ओल्या खोबऱ्याचे काप, दही, हरभरा डाळ(तुम्ही डाळी ऐवजी डाळं देखील घेऊ शकता.) काकडी, लोणचं (तुम्ही तुमच्या आवडीनुसार लिंबाचं किंवा कैरीचं लोणचं घेऊ शकता.) शेंगदाणे, साखर, मीठ, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि तुळशीची पाने हे साहित्य लागेल.
advertisement
गोपाळकाला बनवण्याची कृती
सर्वप्रथम पोहे पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे. त्यानंतर एका भांड्यामध्ये ते पोहे लाह्या, डाळींबाचे दाणे, सफरचंदाच्या फोडी, ओल्या खोबऱ्याच्या फोडी आणि दही टाकायचं. पण ते दही जास्त आंबट नसावं, थोडंसं गोडसर दही टाकावं. त्यानंतर हरभरा डाळ टाकायची. पण ही डाळ अगोदर एक ते दोन तास भिजू घालत ठेवायची आणि त्यानंतरच टाकायची. काकडीच्या बारीक फोडी देखील त्यात घालायच्या आहेत.
advertisement
लोणचं तुम्ही मिक्सरमधून बारीक करून देखील घेऊ शकता. लोणच्याची पेस्ट तुम्ही यामध्ये टाकू शकता. त्यानंतर शेंगदाणे टाकायचे. तुम्ही शेंगदाणे भाजून घेतले तरी चालेल. चवीनुसार साखर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि बारीक चिरलेली मिरची, कोथिंबीर आणि तुळशीचे पाने देखील टाकायची. हे सर्व साहित्य एकत्र टाकून व्यवस्थित रित्या एकजीव करून घ्यायचं.
तयार मिश्रणात वरून गार्निशिंगला डाळिंबाचे दाणे, थोडीशी कोथिंबीर आणि श्रीकृष्ण यांना आवडणारी तुळशीची पाने टाकायची. अशाप्रकारे झटपट गोपाळकाला बनवून तयार होतो. तर या गोकुळाष्टमीला तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धीनं गोपाळकाला बनवू शकता.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
August 16, 2025 10:09 AM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
Dahihandi 2025: गोकुळाष्टमीला आपल्या घरीच बनवा गोपाळकाला, अवघ्या 5 मिनिटांत रेसिपी तयार