Bacharchi Ukad Recipe : हिवाळ्यात शरिराला हवीय उष्णता? गरमागरम बनवा बाजरीची उकड, रेसिपीचा Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
हिवाळा म्हटले की आपण सर्वजण गरम असे पदार्थ खातो. बाजरी देखील गरम पदार्थ आहे, जेणेकरून आपल्याला उष्णता मिळते.
छत्रपती संभाजीनगर : हिवाळा सुरू आहे. हिवाळा म्हटले की आपण सर्वजण गरम असे पदार्थ खातो. बाजरी देखील गरम पदार्थ आहे, जेणेकरून आपल्याला उष्णता मिळते. बाजरीचे आपण भाकरी करून खातो, पण तुम्ही कधी बाजरीची उकड किंवा बाजरीच्या कन्या खाल्ल्यात का? मराठवाड्यामध्ये याला बाजरीच्या कन्या देखील म्हणतात. याची रेसिपी कशी करायची ते पाहुयात.
यासाठी लागणारे साहित्य
एक वाटी बाजरी घ्यायची. ती भाजून आणि त्याला बारीक दळून घ्यायचं. मिक्सरमधून काढले तरी चालेल. मीठ, तिखट, हळद, जिरे, मोहरी, तिळ, लसूण आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर एवढे साहित्य लागेल.
advertisement
कृती:
सगळ्यात पहिले गॅसवर कुकर ठेवायचा. त्यानंतर त्यामध्ये तेल घालायचं. तेल गरम झाले की जिरे, मोहरी टाकायचं. जिरे, मोहरी तडतडली की त्यामध्ये लसूण टाकायचा. लसूण लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि त्यानंतर गरम पाणी टाकायचे. हे एका वाटीला दोन वाट्या पाणी असं प्रमाण घ्यायचं. त्यामध्ये टाकायचं.
advertisement
गरम पाणी टाकल्यानंतर त्यात अर्धा चमचा हळद, दोन चमचे तिखट (तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाकू शकता), तिळ टाकून घ्यायचे. याला उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर आपण जे बाजरी बारीक करून घेतलेली आहे, त्यामध्ये टाकून त्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं. त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गाठी राहता कामा नये. फेटून झाल्यानंतर त्यामध्ये हिरवी कोथिंबीर टाकायची आणि कुकर वरती दोन शिट्ट्या करून घ्यायच्या मध्यम आचेवरती.
advertisement
दोन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून टाकायचा. त्याला थोडं थंड होऊ द्यायचं आणि कुकर उघडून सर्व एकत्र एकजीव करून घ्यायचं. अशा पद्धतीने तुमची ही बाजरीची उकड किंवा बाजरीच्या कन्या बनवून तयार होतात. तर तुम्ही देखील एकदा घरी नक्की ट्राय करा.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
November 27, 2025 6:13 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Bacharchi Ukad Recipe : हिवाळ्यात शरिराला हवीय उष्णता? गरमागरम बनवा बाजरीची उकड, रेसिपीचा Video

title=अशी करा बाजरीची उकड किंवा बाजरीच्या कन्या