Road Safety Week: हे आज गरजेचं आहे! तुमच्या मुलांना आताच समजावून सांगा, वाहतुकीचे नियम
- Published by:sachin Salve
- local18
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
मोठे व्यक्ती तर वाहतुकीचे नियम पाळत नाही. पण, लहान मुलांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांना लहान पणापासूनच वाहतुकीचे नियम सांगायला हवेत. जेणेकरून पुढे जाऊन ते जनजागृती करतील.
मुंबई : भारतात असे मोजके ठिकाणे असतील जिथे वाहतुकीचे नियम पूर्णपणे पाळले जातात. अनेक ठिकाणी वाहतुकीचे नियम पाळले जात नसल्याने अपघात घडतात. मोठे व्यक्ती तर वाहतुकीचे नियम पाळत नाही. पण, लहान मुलांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांना लहान पणापासूनच वाहतुकीचे नियम सांगायला हवेत. जेणेकरून पुढे जाऊन ते जनजागृती करतील. लहान मुलांना वाहतुकीबाबत काय काय माहित असायला हवं ते जाणून घेऊ.
1. लहानपणापासूनच मुलांना वाहतूक सुरक्षा चिन्हे आणि खुणा माहित असायला हव्यात. त्यांना हे माहित असले पाहिजे की, हिरवा म्हणजे जा आणि लाल म्हणजे थांबा.
2. मुलांना लहानपणापासूनच चालत्या वाहनातून हात किंवा चेहरा बाहेर काढू नका, असं सांगितलं पाहिजं. कारण ते अतिशय धोकादायक असू शकते.
3. मुलांना रस्ता कसा ओलांडायचा कसा, हे माहित असलं पाहिजं. म्हणून, मुलांना थांबा, बघा आणि जा या नियमाचे पालन करायला शिकवणे गरजेचं आहे.
advertisement
4. मुलांनी वाहनांच्या हॉर्नकडे आणि त्यांच्या आवाजाकडे लक्ष दिलं पाहिजं. ज्यामुळे येणाऱ्या वाहनांपासून त्याला स्वतःचे संरक्षण करता येईल.
5. मुलांनी रस्त्यावर धावू नये. त्यामुळे चुकून एखाद्या गाडीला धडकण्याची शक्यता असते.
6. मुलांना फूटपाथ किंवा सर्व्हिस लेन वापरण्यास सांगितले पाहिजे. फक्त पादचाऱ्यांसाठी असलेल्या क्रॉसिंगवरूनच रस्ता ओलांडला पाहिजे. त्याचबरोबर झेब्रा क्रॉसिंगबद्दल मुलांना माहिती सांगितली पाहिजे.
advertisement
7. वळण असलेल्या ठिकाणाहून कधीही रस्ता ओलांडू नका. असं केल्यास वेगाने येणाऱ्या वाहनांचा धक्का लागू शकतो, असंही मुलांना सांगितले पाहिजे.
8. स्कूल बस पूर्णपणे थांबली की मगच त्यातून उतरा. त्यानंतर खाली उभे रहा आणि बस सुटल्यावर रस्ता पार करा.
9. कोणत्याही गाडीचा दरवाजा अचानक उघडू नका. यामुळे मुलाला वाहनाची धडक बसू शकते. पुढे-मागे पाहूनच दार उघडा.
advertisement
10. रात्री मुलांना कधीही गडद रंगाचे कपडे घालायला लावू नका. रस्त्यावर काळे कपडे दिसत नाहीत, त्यामुळे ते वाहनांनी धडकू शकतात.
अपघाताचं कारण काय?
भारतातील लोकांना रस्ता सुरक्षेबद्दल फारशी जागरूकता नाही. लोकसंख्या आणि वाहनांची गर्दी ही देखील एक मोठी समस्या आहे. त्याहून मोठी समस्या म्हणजे खराब रस्ते ज्यामुळे अपघात होतात. अनेक सरकारी नियम आणि कायदे असूनही, अपघात होतातच.
advertisement
1. वाहनांची खराब स्थिती - भारतीय कार उत्पादक त्यांच्या वाहनांमध्ये सेफ्टी टूल्स डिझाइन करत नाहीत. बाहेरील देशांमध्ये, नवनवीन सेफ्टी टूल्स वापरून कार तयार केल्या जातात. भारतातील वाहनं अजूनही यामध्ये मागे आहेत.
2. उदासीन धोरण - सरकारे त्यांच्या रस्त्यांचे योग्य नियोजन करत नाहीत. रस्त्यांच्या स्थितीबद्दल सरकारही उदासीन आहे.
3. आपत्कालीन सेवांचा अभाव - रस्ता सुरक्षा नियम असूनही, आपत्कालीन सेवांचा तीव्र अभाव आहे. अपघातात जखमी झालेल्या अनेकांना त्वरित उपचार मिळाले नाहीत तर त्यांचा जागीच मृत्यू होतो. म्हणून, आपत्कालीन सेवा उपलब्ध असणे खूप महत्वाचे आहे.
advertisement
4. जागरूकतेचा अभाव - याशिवाय, नागरिकांमध्ये जबाबदारीचा पूर्ण अभाव आहे.
5. खराब रस्ते- भारतातील रस्ते अपघातांचे मुख्य कारण खराब रस्ते आहेत. प्रत्येकाने रस्ते सुरक्षा नियमांचे पालन केले पाहिजे. रस्ता सुरक्षा नियम हे सुसंस्कृत जीवनाचा एक भाग आहेत. म्हणून आपण सर्वांनी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे. देशातील रस्त्यांच्या नियमांबद्दल मुलांना आणि किशोरांनाही शिक्षित केले पाहिजे आणि जागरूक केले पाहिजे.
advertisement
#NationalHighwaysAuthorityofIndia #NHAI #MinistryOfRoadTransportAndHighways #MORTH
#NitinGadkari
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 10, 2025 10:26 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Road Safety Week: हे आज गरजेचं आहे! तुमच्या मुलांना आताच समजावून सांगा, वाहतुकीचे नियम


