Peanuts Side Effects: शेंगदाणे खाल्ल्यानंतर लगेच करू नका ‘ही’ चूक, एक चूक देईल अनेक आजारांना निमंत्रण

Last Updated:

Side Effects of Drinking Water after Eating Moongfali: शेंगदाणे हे उष्ण प्रकृतीचे असतात. त्यामुळे ते खाल्ल्यामुळे शरीराची उष्णता वाढू शकते. अशा स्थितीत लगेच पाणी प्यायल्याने शरीराच्या तापमानाचं संतुलन बिघडतं. जेव्हा आपण एकाच वेळी थंड आणि उष्ण प्रकृतीचे पदार्थ खातो त्यावेळी सर्दी, खोकला आणि श्वसनाच्या इतर अनेक समस्या उद्भवू शकतात.

प्रतिकात्मक फोटो : शेंगदाणे खाताय, मग ‘ही’ चूक करू नका होतील वाईट परिणाम
प्रतिकात्मक फोटो : शेंगदाणे खाताय, मग ‘ही’ चूक करू नका होतील वाईट परिणाम
मुंबई: शेंगदाणे किंवा भुईमुगाच्या शेंगा हा अनेकांच्या आवडीचा प्रकार. काहींना पाण्यात उकडेल्या शेंगा आवडतात तर काहींना भाजलेल्या. प्रवासात शेंगा खाणं एक चांगला टाईमपास ठरू शकतो. म्हणूनच अनेक बस स्थानकांच्या बाहेर  खारे शेंगदाणे किंवा भुईमुगाच्या शेंगा विकणारे भरपूर असतात. मात्र शेंगदाणे हे खारे असोत की कच्चे, भाजलेलं किंवा उकडलेले किंवा ते भुईमुगाच्या शेंगातले दाणे असोत, शेंगदाणे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणं आरोग्यासाठी धोक्याचं ठरू शकतं.
आयुर्वेदाच्या आहारविषयक नियमांनुसार, शेंगदाणे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्याची चूक करू नये. यामुळे पचनाच्या समस्या आणि इतर आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. पोषणतज्ञ आणि आरोग्य तज्ज्ञ वरुण कत्याल म्हणतात की, शेंगदाणे हे उष्ण प्रकृतीचे असतात. त्यामुळे ते खाल्ल्यामुळे शरीराची उष्णता वाढू शकते. अशा स्थितीत लगेच पाणी प्यायल्याने शरीराच्या तापमानाचं संतुलन बिघडतं. जेव्हा आपण एकाच वेळी थंड आणि उष्ण प्रकृतीचे पदार्थ खातो त्यावेळी सर्दी, खोकला आणि श्वसनाच्या इतर समस्यांचा त्रास होऊ शकतो.
advertisement

काय सांगतं आयुर्वेद?

आयुर्वेदाच्या पाचक प्रणालीमध्ये वात, पित्त आणि कफ हे तीन दोष आहेत. या तीन दोषांपैकी कोणत्याही एका दोषाच्या असंतुलनामुळे शरीराला त्रास होऊ शकतो. शेंगदाणे हे गरम असल्याचे ते पचायलाही जड असतात. शेंगदाणे पचवण्यासाठी शरीराला जास्त मेहनत घ्यावी लागते. शेंगदाणे खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पचन प्रक्रियेला अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. आयुर्वेदानुसार अशा उष्ण  प्रकृतीच्या गोष्टी खाल्ल्यानंतर किमान 20 मिनिटे काहीही खाऊ नये किंवा पिऊ नये.
advertisement

Peanuts Side Effects: शेंगदाणे खाताय, मग ‘ही’ चूक करू नका होतील वाईट परिणाम

शेंगदाणे खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने कोणते त्रास होतात.
advertisement

चयापचयावर परिणाम

शेंगदाणे खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने चयापचयावरही वाईट परिणाम होऊ शकतो.आधी सांगितल्या प्रमाणे शेंगदाणे हे पचायला जड असतात. अशा परिस्थितीत, शेंगदाणे खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने पचनाची क्रिया आणखी मंदावते, ज्यामुळे वजन वाढणे, गॅस, अपचन आणि पोटदुखी, पोटफुगी अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
advertisement

ॲसिडिटी आणि ओटीपोटात दुखणे

शेंगदाणे हे उष्ण प्रकृतीचे असून ते तेलकट असतात. यामुळे पोटात उष्णता निर्माण होते. अशा स्थितीत जर तुम्ही पाणी प्यायलो पोटाची उष्णता अचानक थंड होते. त्यामुळे  ज्यामुळे आम्लता किंवा पोटात जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
ॲलर्जी

शेंगदाणे खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याचा  परिणाम पाचक रसांवर होऊन ते पातळ होतात. त्यामुळे एलर्जीचा धोका वाढू शकतो. ही ऍलर्जी श्वसनमार्गासाठी धोकादायक आहे. त्यामुळे फुफ्फुसं, घसा आणि श्वसनमार्गाला त्रास होऊ शकतो.

advertisement
पचनसंस्थेवर परिणाम

शेंगदाणे खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. शेंगदाणे खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने पाचक रस पातळ होतो, ज्यामुळे शेंगदाणे पचवणं कठीण जातं. यामुळे गॅस, अतिसार आणि ओटीपोटात दुखू शकतं.

त्यामुळे तुम्हाला हिवाळ्यात जर शेंगदाणे खाण्याचा आनंद घ्यायचा आहे तर शेंगदाणे कमी प्रमाणात खाणं केव्हाही फायद्याचं मात्र ते खाल्ल्यावर लगेच पाणी पिणं टाळा म्हणजे शेंगदाण्यांमुळे तुमच्या शरीराला आतून उबदार ठेवायला मदत करतील आणि त्याचा त्रासही होणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Peanuts Side Effects: शेंगदाणे खाल्ल्यानंतर लगेच करू नका ‘ही’ चूक, एक चूक देईल अनेक आजारांना निमंत्रण
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement