Skin Care Routine : उन्हापासून करा चेहऱ्याचं रक्षण, त्वचेचं आरोग्य जपण्यासाठीच्या सोप्या टिप्स
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
दूध, डाळीचं पीठ आणि काकडी या तीनच गोष्टी त्वचेच्या निगराणीसाठी आवश्यक आहेत. आठवड्यातून एकदा सकाळी किंवा संध्याकाळी घरातल्याच या 3 गोष्टींचा वापर केला तर चेहरा सतेज दिसतो. यामुळे संपूर्ण आठवडा चेहऱ्यावर ग्लो राहील आणि त्वचेचं आरोग्यही चांगलं राहील.
मुंबई : नेहमीपेक्षा उन्हाळ्यात त्वचा अनेकदा कोरडी, कधी चिकट होते. त्यातून तुम्ही जर बराच वेळ घराच्या बाहेर असाल तर उन्हामुळे त्वचा निर्जीव दिसू शकते. तीव्र सूर्यप्रकाश आणि धुळीच्या संपर्कामुळे आणि थकव्यामुळे त्वचा निर्जीव दिसू लागते आणि त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर चेहरा निस्तेज दिसतो. त्यामुळे त्वचेची काळजी वेळेवर घेणं गरजेचं आहे.
व्यस्त जीवनशैलीमुळे रोज फेस वॉश आणि मॉइश्चरायझरशिवाय दुसरं काही लावणं अवघड होऊ शकतं. फेस मास्क वगैरेही रोज लावले जात नाहीत. अशा परिस्थितीत आठवड्यातून एकदा सकाळी किंवा संध्याकाळी घरातल्याच 3 गोष्टींचा वापर केला तर चेहरा सतेज दिसतो. यामुळे संपूर्ण आठवडा चेहऱ्यावर ग्लो राहील आणि त्वचेचं आरोग्यही चांगलं राहील. दूध, डाळीचं पीठ आणि काकडी या तीनच गोष्टी त्वचेच्या निगराणीसाठी आवश्यक आहेत.
advertisement
चेहरा दुधानं स्वच्छ करा
सर्वप्रथम, चेहरा स्वच्छ करण्यासाठी दुधाचा वापर करा. कच्च्या दुधात क्लिंजिंग गुणधर्म असतात आणि यामुळे त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यामुळे त्वचेवर साचलेली घाण, धूळ आणि काजळीही निघते. एका भांड्यात दूध घ्या. त्यात कापूस बुडवून चेहऱ्याला लावा आणि चोळा. 4 ते 5 मिनिटं दुधानं त्वचा स्वच्छ केल्यानंतर पाण्यानं धुवा. त्वचेवर चमक येईल.
advertisement
बेसनाचा फेस पॅक लावा
बेसनापासून सर्वात सोपा आणि प्रभावी फेस पॅक तयार केला जाऊ शकतो. बेसन फेस पॅकमुळे त्वचेवरचे डाग निघतात. चेहऱ्यावर चमक येते आणि त्वचा मुलायम होण्यासाठी हा पॅक फायदेशीर ठरतो. फेस पॅक बनवण्यासाठी 2 चमचे बेसनामध्ये 2 चिमूट हळद मिसळा आणि पेस्ट बनवण्यासाठी पुरेसं दही घाला. चांगलं मिसळल्यानंतर हा फेस पॅक 15 ते 20 मिनिटं चेहऱ्यावर लावा आणि नंतर चेहरा धुवून स्वच्छ करा. यामुळे त्वचा उजळ होते.
advertisement
त्वचेला ताजेपणा देणारा टोनर
त्वचेवर ताजेपणा कायम ठेवण्यासाठी काकडीचा टोनर लावता येतो. साध्या पाण्यात किंवा गुलाब पाण्यात काकडीचा रस मिसळा, कापसावर लावा आणि चेहऱ्यावर पूर्णपणे पसरवा. टोनर लावल्यानंतर चेहरा धुण्याऐवजी ते रात्रभर ठेवू शकता किंवा 10 ते 15 मिनिटांनी चेहरा धुवू शकता. टोनर आठवड्यातून एकदाच नाही तर रोजही लावता येतो. चेहरा धुतल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका.
advertisement
आठवड्यातून एकदा या तीन गोष्टी चेहऱ्यावर लावल्यानं त्वचा चमकदार होण्यास मदत होते. या स्किन केअर रुटीनमुळे त्वचा फ्रेश राहते आणि त्यासाठी तुम्हाला पार्लरमध्ये जाण्याचीही गरज भासणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 26, 2025 12:53 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care Routine : उन्हापासून करा चेहऱ्याचं रक्षण, त्वचेचं आरोग्य जपण्यासाठीच्या सोप्या टिप्स