advertisement

Traditional Curry : झणझणीत काळ्या मसाल्यातलं वाफ वड्याचं कालवण! अशी भन्नाट रेसिपी एकदा तरी ट्राय करावीच..

Last Updated:

Zanzanit kala masala vafavadi bhaji recipe : आज आपण पाहणार आहोत, झणझणीत काळ्या मसाल्यातलं वाफ वड्याचं कालवण. ही रेसिपी stylishachari या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली गेली आहे. चला स्टेप बाय स्टेप पाहूया ही रेसिपी कशी बनवायची.

झणझणीत काळा मसाला वाफवडी कालवण रेसिपी
झणझणीत काळा मसाला वाफवडी कालवण रेसिपी
मुंबई : महाराष्ट्रातील अनेक अशा पाककृती आहेत, ज्या परंपरागत आपल्या घरामध्ये बनत असतात. बऱ्याच रेसिपी विस्मृतीतही गेल्या आहेत. मात्र आता लोक त्या रेसिपी शोधून शोधून सर्वांसमोर आणतात. या रेसिपीज खरंच खूप वेगळ्या पौष्टिक आणि चवीलाही तितक्याच जबरदस्त असतात. आज आम्ही तुम्हाला अशीच एक भन्नाट रेसिपी सांगत आहोत.
आज आपण पाहणार आहोत, झणझणीत काळ्या मसाल्यातलं वाफ वड्याचं कालवण. ही रेसिपी stylishachari या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली गेली आहे. चला स्टेप बाय स्टेप पाहूया ही रेसिपी कशी बनवायची.
वाफ वड्याचं कालवण बनवण्यासाठी लागणारे साहित्य..
- लसूण
- आलं
- हिरवी मिरची
- भाजलेलं सुकं खोबरं
- भाजलेला कांदा
- भाजलेले काळे तीळ
advertisement
- कोथिंबीर
- जिरे
- कढीपत्ता
- लाल तिखट
- हळद
- कांदा लसूण मसाला
वाफ वड्याचं कालवण बनवण्याची कृती..
- एका मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली चणा डाळ घ्या. त्यामध्ये लसूण, आलं, हिरवी मिरची टाकून पाणी न टाकता थोडं जाडसर वाटून घ्या.
- आता हे एका भांड्यात काढा आणि यामध्ये ओवा, हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ टाकून हे सर्व एकत्र करून घ्या.
advertisement
- एक प्लेट तेलाने ग्रीस करून घ्या आणि त्यामध्ये हे मिश्रण थोडे थोडे घेऊन त्याच्या वाद्य टाकून घ्या.
- आता ही प्लेट उकळत्या पाण्यावर ठेऊन वडे वाफवून घ्या.
- आता वाटण बनवण्यासाठी भाजलेलं सुकं खोबरं, भाजलेला कांदा, लसूण, हिरवी मिरची, भाजलेले काळे तीळ, कोथिंबीर आणि पाणी टाकून बारीक पेस्ट तयार करा.
advertisement
- एका कढईमध्ये तेल टाका. ते गरम झाल्यावर जिरे, कढीपत्ता, वाटलेली पेस्ट टाकून परतून घ्या.
- नंतर यामध्ये लाल तिखट, हळद, कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित परतून घ्या.
- त्यानंतर गरम पाणी टाका, याला उकळी येऊ द्या.
- पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये वाफवलेले वडे टाका आणि 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्या.
advertisement
- शेवटी भरपूर कोथिंबीर घालून गॅस बंद करा.



 










View this post on Instagram























 

A post shared by Ganesh Shedge (@stylishachari)



advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Traditional Curry : झणझणीत काळ्या मसाल्यातलं वाफ वड्याचं कालवण! अशी भन्नाट रेसिपी एकदा तरी ट्राय करावीच..
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement