हृदयरोग, मधुमेह आणि बरंच काही, जीभेचा रंग देतो गंभीर आजाराचा इशारा; हा रंग सर्वांत घातक
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
जीभेच्या रंगावरून डॉक्टर आपल्याला झालेल्या आजाराचे निदान करतात. तसेच आपल्या जीभेचा रंग आपल्या आरोग्याबाबत अनेक गोष्टी सांगतो.
अनेकदा आपण कोणत्या ना कोणत्या कारणाने आजारी पडत असतो. अशावेळी डॉक्टरकडे गेलो असता ते आवर्जून एक गोष्ट करतात. डॉक्टर बहुतेक वेळा आपला आजार तपासत असताना आपली जीभ देखील तपासतात. आपल्यापैकी अनेकजणांना प्रश्न पडला असेल की जीभ पाहून डॉक्टरांना आपल्या आजाराबद्दल कसे समजत असेल. या किचकट वाटणाऱ्या प्रश्नाचं सोप्प उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.
जीभेच्या रंगावरून डॉक्टर आपल्याला झालेल्या आजाराचे निदान करतात. तसेच आपल्या जीभेचा रंग आपल्या आरोग्याबाबत अनेक गोष्टी सांगतो. जीभेचा रंग बदलल्यास आपल्याला आजाराबाबत संकेत मिळतात जेणेकरून आपण त्वरित त्यावर उपचार करू शकतो. आज आपण जीभेच्या रंगावरून घरबसल्या आजाराचे निदान कसे करावे जाणून घेऊया.
advertisement
जीभेवरील पांढरे डाग
जर तुमच्या जीभेवर पांढरे डाग असतील तर हे यीस्ट इंफेक्शनचे लक्षण आहे. बरेचदा यीस्ट इंफेक्शन लहान मुले किंवा वयस्कर व्यक्तींना होते. तसेच डिहायड्रेशन, ल्यूकोप्लाकिया हा जीभेचा आजार यांबाबत समस्या असल्यासही जीभ पांढरी होते. हे आजार जास्त घातक नसतात.
फिकट रंगाची जीभ
जीभेचा रंग फिकट झाल्यास शरीरात रक्ताची कमतरता असू शकते. यामुळे एनीमिया, व्हिटॅमिन बी-12 ची समस्या वाढू शकते. अशा परिस्थितीत त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
advertisement
जीभेचा पिवळा रंग
कावीळ झाल्यावर जीभेचा रंग पिवळा होऊ शकतो. हे या आजाराचे प्रारंभिक लक्षण असू शकते. असे असल्यास त्वरीत संपर्क साधावा. कारण हा अतिशय गंभीर आजार आहे. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.
काळी जीभ
जर तुम्हाला तुमच्या जीभेचा रंग काळा वाटत असेल तर ही धोक्याची घंटा आहे. काळी जीभ हे गळ्याचे इंफेक्शन किंवा बॅक्टेरिया यांचे लक्षण असू शकते. जास्त औषधे घेतल्यानेही जीभ काळी होऊ शकते. मधुमेह आणि कॅन्सर झालेल्या बहुतेक रुग्णाची जीभ काळी असते. याशिवाय पोटाचा अल्सर झाल्यासही जीभ काळी होऊ शकते.
advertisement
जीभेचा निळा रंग अतिशय घातक
जीभेचा रंग निळा होणे अजिबात चांगले नाही. हा रंग हृदयाशी संबंधित समस्यांकडे लक्ष वेधते. जर हृदय कमी रक्त पंप करत असेल तर जीभेचा रंग निळा होऊ लागतो. ही एखादी किरकोळ समस्या समजून याकडे दुर्लक्ष करू नये. कारण ही अतिशय गंभीर समस्याआहे.
निरोगी जीभेचा रंग कसा असतो?
काही आरोग्यतज्ज्ञांच्या सांगण्यानुसार जीभेचा गडद गुलाबी रंग आणि त्यावर हलका पांढरा थर हे निरोगी जीभ आणि निरोगी आरोग्याचे लक्षण आहे. तसेच त्यावर कोणतेही दाणे नसतात. त्याचबरोबर कोरडी जीभ हे देखील आजाराचे लक्षण आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 13, 2024 10:53 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
हृदयरोग, मधुमेह आणि बरंच काही, जीभेचा रंग देतो गंभीर आजाराचा इशारा; हा रंग सर्वांत घातक