या सण-उत्सवात चेहरा उजळेल, चीन-जपानमध्ये मिळणारं हे फळ बाजारात सहज उपब्लध!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
औषधी गुणांनी भरपूर असलेल्या या फळात सी जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असतं. शिवाय हे फळ चवीला जितकं स्वादिष्ट असतं, तितकंच ते चेहऱ्यावर तेजही देतं.
पवन सिंह कुंवर, प्रतिनिधी
हल्द्वानी, 25 सप्टेंबर : भारताच्या डोंगराळ भागातील लोक सुंदर आणि सुदृढ असतात, असं आपण सहज म्हणतो. मात्र खरोखरच डोंगराळ भागात अशा अनेक फळांची लागवड केली जाते, जे आरोग्यासाठी प्रचंड उपयुक्त असतात. ही फळं खाल्ल्यामुळेच तेथील लोकांचं आरोग्य छान निरोगी राहतं.
उत्तराखंडच्या डोंगरांवर सहजपणे मिळणारं, अनेक आजारांवर रामबाण असं फळ म्हणजे 'काकू'. औषधी गुणांनी भरपूर असलेल्या या फळात सी जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असतं. शिवाय हे फळ चवीला जितकं स्वादिष्ट असतं, तितकंच ते चेहऱ्यावर तेजही देतं.
advertisement
हल्द्वानीचे वरिष्ठ आयुर्वेद विशेषज्ज्ञ डॉ. विनय खुल्लर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जपान आणि चीनमध्ये मिळणारं काकू फळ उत्तराखंडच्या कुमाऊंमध्ये आढळतं. विशेषतः नैनिताल जिल्ह्यातील रामगड, ज्योलिकोट, नथुआ खान आणि चोपडा भागात हे फळ अगदी सहज मिळतं. फायबर, कार्बोहायड्रेट, आयर्न, प्रोटीन, मॅग्नेशियम, कॅल्शियम या पोषक तत्त्वांसह साखर आणि जीवनसत्त्व ई, ए, सी या फळात मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे विविध आजारांवर हे फळ गुणकारी मानलं जातं.
advertisement
सध्या तेथील बाजारपेठेत या फळाला प्रति किलो 100 ते 120 रुपये इतका भाव आहे. या फळासह उत्तराखंडच्या जंगलांमध्ये इतर अनेक अशी फळं मिळतात जी आरोग्यासाठी गुणकारी असतात आणि त्यांपासून विविध औषधं बनवली जातात. मात्र ही सगळी फळं बाजारात विक्रीसाठी उपलब्ध नसल्याने ग्राहकांना त्यांबाबत पुरेशी माहिती नसते. दरम्यान, काकू हे हंगामी फळ आहे. ज्यामुळे शरीराला जीवनसत्त्व आणि खनिजं मिळतात. शिवाय चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येतं आणि हाता-पायांच्या दुखण्यापासून मुक्ती मिळते.
Location :
Haldwani Talli,Nainital,Uttarakhand
First Published :
September 25, 2023 6:17 PM IST