Til Laddu Recipe : तीळ आणि खव्याचे हे शाही लाडू वाढवतील संक्रांतीची लज्जत, पाहा सोपी रेसिपी
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Makar Sankranti Recipe : तीळ गुळाचे लाडू तर सर्वजण करतात. मात्र, तुम्ही कधी तीळ आणि खव्याचे शाही लाडू खाल्ले आहेत का? आज आम्ही तुम्हाला या लाडूंची एक सोपी आणि झटपट होणारी रेसिपी सांगणार आहोत.
मुंबई : दरवर्षी मकरसंक्रांतीला इतर गोडधोड पदार्थांसोबत तिळाच्या लाडवांचा आवर्जून बेत असतो. तीळ गुळाचे लाडू तर सर्वजण करतात. मात्र, तुम्ही कधी तीळ आणि खव्याचे शाही लाडू खाल्ले आहेत का? आज आम्ही तुम्हाला या लाडूंची एक सोपी आणि झटपट होणारी रेसिपी सांगणार आहोत. हे तीळ खव्याचे शाही लाडू तुमच्या घरच्यांना आणि पाहुण्यांना नक्की आवडतील.
साहित्य..
पांढरे तीळ - ½ कप
खवा - 125 ग्रॅम
पिठीसाखर - ½ कप
वेलची पावडर - 3 ते 4
तूप - १ चमचा किंवा आवश्यकतेनुसार
तीळ खव्याचे लाडू बनवण्याची कृती
एक पॅन घ्या आणि त्यात थोडे पांढरे तीळ घाला. साधारण २ ते ३ मिनिटे मंद आचेवर ते भाजून घ्या. मग तीळ तेल सोडतील आणि हलके सोनेरी होतील. यानंतर तीळ पॅनमधून बाहेर काढा आणि टिश्यूवर पसरवून थंड होण्यासाठी ठेवा. आता त्याच कढईत थोडा कुस्करलेला किंवा किसलेला खवा घाला. खवा सोनेरी पर्यंत परतून घ्या आणि नंतर गॅस बंद करा.
advertisement
यानंतर तीळ थंड झाल्यावर ते मिक्सरमध्ये फिरवून घ्या. खवादेखील थंड थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घ्या. आता एका भांड्यात खवा आणि तीळ एकत्र करा. त्यात थोडी वेलची पूड आणि पिठीसाखर घालून सर्व एकत्र करून घ्या. या मिश्रणातील सर्व गुठळ्या काढा आणि त्यात थोडे तूप घाला. यानंतर मिश्रण पुन्हा एकदा चांगले मिसळून लाडू वळून घ्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यात सुके मेवेदेखील घालू शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 09, 2024 10:35 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Til Laddu Recipe : तीळ आणि खव्याचे हे शाही लाडू वाढवतील संक्रांतीची लज्जत, पाहा सोपी रेसिपी