advertisement

‘हे’ आहेत भारतातील टॉप 10 धोकादायक आजार, काय आहे लक्षणं जाणून घ्या

Last Updated:

ज्यांचा उपचाराचा खर्च जास्त असून तुम्हाला या उपचाराच्या खर्चापासून दिलासा देण्यासाठी आरोग्य विमा खरेदी करणं आवश्यक आहे.

एका अहवालानुसार, चारपैकी एक वृद्ध व्यक्ती एकाकीपणाचा बळी आहे, जरी तरुण आणि किशोरवयीन देखील यापासून सुटलेले नाहीत.
एका अहवालानुसार, चारपैकी एक वृद्ध व्यक्ती एकाकीपणाचा बळी आहे, जरी तरुण आणि किशोरवयीन देखील यापासून सुटलेले नाहीत.
मुंबई : आरोग्य चांगलं असलं तरीही कधी कोणती दुर्घटना होईल किंवा कुटुंबाचा एखादा सदस्य आजारी पडेल, हे सांगता येत नाही. भारतामध्ये काही आजारांच्या उपचाराचा खर्च खूपच जास्त आहे. या खर्चाचा एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीवर देखील मोठा परिणाम होऊ शकतो. अशावेळी तुम्ही जर आरोग्य विमा घेतला असेल, तर तुम्हाला उपचाराच्या खर्चाची चिंता नसते. आज आम्ही तुम्हाला अशाच भारतातील टॉप 10 आजारांबद्दल माहिती देणार आहोत, ज्यांचा उपचाराचा खर्च जास्त असून तुम्हाला या उपचाराच्या खर्चापासून दिलासा देण्यासाठी आरोग्य विमा खरेदी करणं आवश्यक आहे.
एखाद्या प्राणघातक आजारामुळे भारतात, जगभरात किती जीव गेले हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला माहीत आहे का की भारतात कोणते आजार सर्वात धोकादायक, जीवघेणे म्हणून ओळखले जातात? चला तर आज भारतातील टॉप 10 सर्वात धोकादायक आजार, त्या आजारांची लक्षणे, कारणे, उपचार आदींबददल जाणून घेऊ.
मधुमेह
मधुमेह (डायबेटिस) हा एक जीवघेणा आजार आहे. या आजाराचे दोन प्रकार असतात ते म्हणजे टाइप 1 मधुमेह आणि टाइप 2 मधुमेह. भूक जास्त लागणे, विनाकारण वजन कमी होणे, थकवा येणे, वारंवार लघवी होणे अशी मधुमेहाची लक्षणे आहेत. तर, चुकीच्या खाण्याच्या सवयी, नियमित व्यायाम न करणे, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा इ. मधुमेह होण्याची कारणे आहेत. मधुमेह झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा हा आजार होऊ नये, यासाठी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही नियमित व्यायाम, योग्य जीवनशैली, पौष्टिक अन्नाचे सेवन, धुम्रपान टाळणे, फायबर युक्त आहाराचे सेवन केल्यास तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता कमी राहील.
advertisement
अल्झायमर
अल्झायमर हा आजार स्मरणशक्ती कमी होण्याशी संबंधित आहे. या आजारामुळे एखाद्या गोष्टीचा तर्क लावणे, विचार करण्याची क्षमता कमी होते. काम करताना अडचण येणे, गोष्टी विसरणे, चुकीचे लिखाण, बोलण्यात, लिहिण्यात समस्या, वारंवार चुकीचे निर्णय घेणे, ही अल्झायमर आजाराची लक्षणे आहेत. हा आजार अनुवांशिक असू शकतो. या शिवाय, वृद्धापकाळ, अस्वस्थ जीवनशैली, डोक्याला झालेला कोणताही आघात अशा कारणांमुळेही हा आजार होतो. या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी तुम्ही निरोगी आहार घेणे, चरबीयुक्त पदार्थ टाळणे, धूम्रपान सोडणे असे उपाय करू शकतात.
advertisement
कोविड
कोविड-19 हा अलीकडच्या काळात जगभरातील सर्वात प्राणघातक आजारांपैकी एक म्हणून ओळखला जातो. कोरोना व्हायरसला जागतिक आरोग्य संघटनेनं मार्च 2020 मध्ये महामारी म्हणून घोषित केलंय. ताप, खोकला, थकवा, चव किंवा वास घेण्याची क्षमता कमी होणे, घसा खवखवणे, सर्दी, श्वास घेण्यात अडचण, स्नायू वेदना, छातीत वेदना इ. कोविडची लक्षणे आहेत. कोविड-19 हा साथीचा आजार असून तो कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे होतो, आणि तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो. खोकला, शिंकणे, श्वासोच्छवास इ. काही मार्गांनी तो वेगानं पसरतो. कोविड आजारापासून वाचण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामध्ये आजारी व्यक्तीशी जवळचा संपर्क टाळा, सुरक्षित अंतर ठेवा, नियमित हात धुवा, हँड सॅनिटायझर वापरा, घराबाहेर पडताना चेहरा झाकण्यासाठी मास्क वापरा, डोळे आणि नाकाला स्पर्श करणे टाळा आदी उपायांचा समावेश आहे.
advertisement
मॅलिग्नंट ट्युमर
कॅन्सरच्या पेशीचा हा एक प्रकार असून ज्या अनियंत्रितपणे वाढतात, व संपूर्ण शरीरात पसरतात. त्यामुळे हा आजार होतो. केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील सर्वात धोकादायक आजारांपैकी हा एक आजार आहे. या आजाराची सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. किरणोत्सर्गाच्या संपर्कात येणे, अनुवांशिकता, विषारी पदार्थांच्या संपर्कात येणे अशा कारणांमुळे हा आजार होऊ शकतो. या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी तुम्ही तंबाखूचे सेवन टाळणे, सकस आहार, नियमितपणे लसीकरण, योग्य वजन राहिली अशी जीवनशैली आत्मसात करणे, असे उपाय करू शकता.
advertisement
अतिसार
अतिसार हा एक धोकादायक आजार आहे. यामुळे शरीरातील पाणी आणि मीठ कमी होते, व शरीर निर्जलीकरण होते. जुलाब होणे, शौचासोबत श्लेष्मा पडणे, पोटात गोळा येणे, मळमळ होणे, पोट दुखणे, रक्त पडणे अशी अतिसाराची लक्षणे आहेत. अशुद्ध पाणी पिणे, आजूबाजूला अस्वच्छता असणे, कुपोषण, कमकुवत प्रतिकारशक्ती, अशी अतिसार होण्याची कारणे आहेत. तर, अतिसार होऊ नये यासाठी दारू पिणे टाळा, नियमित स्वच्छ हात धुवा, स्वच्छता राखा, ऍस्पिरिन, स्टिरॉइड्स इत्यादींचा वापर टाळा.
advertisement
हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार (सीव्हीडी)
भारतातील सर्वात धोकादायक आजारांपैकी हा एक आजार आहे. हा हृदयाशी संबंधित आजार असून ज्याचा थेट परिणाम हृदयावर होता. या आजारामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. छातीत दुखणे, धाप लागणे, हातपाय सुन्न पडणे, छातीत अस्वस्थ वाटणे, शरीराच्या इतर भागांमध्ये जसे की मान, पाठ, जबडा, घसा तसेच पोटाचा वरचा भाग दुखणे, अशी या आजाराची लक्षणे आहेत. तंबाखूचे जास्त सेवन, पुरेशी शारीरिक हालचाल नसणे, अयोग्य आणि अल्प आहार, आनुवंशिक कारणे, उच्च रक्तदाब किंवा कोलेस्ट्रॉल सारखा रोग, जादा वजन असणे आदी कारणांमुळे हा आजार होऊ शकतो. हा आजार टाळण्यासाठी तुम्ही शारीरिकरित्या सक्रिय राहा. नियमित व्यायाम करा, वजन नियंत्रित ठेवा. धूम्रपानाची सवय बंद करा. तुमचं ब्लडप्रेशर आणि कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवा. फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम इत्यादींचा समावेश असलेले निरोगी आहार घ्या.
advertisement
स्ट्रोक
मेंदूतील कोणतीही धमनी ब्लॉक झाल्यास स्ट्रोक हा आजार उद्भवतो. हातपाय किंवा चेहरा सुन्न होणे, डोकेदुखी, डोळ्यांनी दिसण्यास अडचण येणे, चालण्यात अडचण, बोलण्यात अडचण ही स्ट्रोकची लक्षणे आहेत. उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांमध्ये स्ट्रोक होण्याचं प्रमाण जास्त असते. या शिवाय, मधुमेह असलेली व्यक्ती, धूम्रपानाची जास्त सवय, ब्रेन हॅमरेजची समस्या असलेल्या व्यक्ती, हृदयरोग असणऱ्या व्यक्ती यांना स्ट्रोकचा धोका जास्त असतो. स्ट्रोक होण्यापासून स्वत:ला वाचवण्यासाठी धूम्रपान सोडा. रक्तदाब नियंत्रणात ठेवा. निरोगी जीवनशैलीचे अनुसरण करा. नियमित व्यायाम करा. दारुचं सेवन बंद करा. उच्च फायबर आणि कमी चरबीयुक्त अन्नाचा आहारात समावेश करा.
श्वसन रोग
श्वासोच्छवासाच्या संसर्गामुळे दरवर्षी देशात मोठ्या प्रमाणात मृत्यू होतात. भारतातील सर्वात धोकादायक आजारांपैकी हा एक आजार आहे. यामध्ये फुफ्फुसाचे आजार, न्यूमोनिया अशा काही आजाराचा समावेश आहे. ताप, खोकला, सर्दी, शिंका येणे, नाक वाहणे, घसा खवखवणे अशी या आजाराची लक्षणे आहेत. विषारी पदार्थांच्या, हवेच्या संपर्कात येणे, कमी रोगप्रतिकारशक्ती, धूम्रपान, धूळ आणि वायू प्रदूषणाच्या संपर्कात येणे अशी या आजाराची कारणे आहेत. श्वसनासंबंधी आजार टाळण्यासाठी धूम्रपान सोडा, नियमित व्यायाम करा, मास्क वापरा, प्रदूषित हवेत जाणे टाळा, प्रथिनेयुक्त आहार घ्या.
क्षयरोग
क्षयरोग फुफ्फुसांना तसेच शरीराच्या इतर अवयवांना संक्रमित करतो. हा जीवघेणा आजार आहे. मात्र, योग्य उपचारांनी हा आजार बरा होऊ शकतो. थकवा, खोकताना रक्त पडणे, ताप आणि सर्दी, रात्री घाम येणे, भूक न लागणे किंवा भूक कमी लागणे, वजन कमी होणे, ही क्षयरोगाची लक्षणे आहेत. कमकुवत रोगप्रतिकारशक्ती, अशा रोगास कारणीभूत असलेल्या भागात राहणे, संक्रमित लोकांचा संपर्कात येणे, अशी क्षयरोग होण्याची कारणे आहेत. तर, क्षयरोगापासून वाचण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये संक्रमित लोकांच्या संपर्कापासून दूर राहणे, लसीकरण करणे, निरोगी अन्न खाणे आदींचा समावेश होतो.
क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज (सीओपीडी)
सीओपीडी हा भारतातील सर्वात धोकादायक आजारांपैकी एक आहे. हा एक फुफ्फुसाचा आजार आहे. ज्यामुळे श्वास घेणं कठीण होतं. हा आजार दरवर्षी जगभरातील हजारो व्यक्तींच्या मृत्यूचं एक कारण आहे. चक्कर येणे, छातीत दुखणे, उत्साह कमी होणे, श्वसन प्रणालीत अडथळा, हातापायांना सूज ही या आजाराची लक्षणे आहेत. धूम्रपान, रासायनिक धुके, आनुवंशिकता अशी या आजाराची कारणे आहेत. या आजारापासून स्वतःला वाचवण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय उपयुक्त ठरतात. यामध्ये धुम्रपान टाळणे, घरात किंवा ऑफिसमध्ये धूळ, धूर इत्यादी टाळा. वायू प्रदूषणापासून दूर राहा.
दरम्यान, भारतामध्ये काही आजारांवरील उपचारांचा खर्च हा खूप मोठा आहे. अशावेळी आरोग्य विमा असणे खूपच उपयुक्त ठरते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
‘हे’ आहेत भारतातील टॉप 10 धोकादायक आजार, काय आहे लक्षणं जाणून घ्या
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement