Trekking Tips: पावसाळ्यात ट्रेकिंग बेतू शकते जीवावर? घरातून बाहेर पडण्याआधी हे चेक केलं का?

Last Updated:

शहरी धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अनेक तरुण निसर्गाच्या सान्निध्याकडे ओढले जात आहेत. मानसिक तणाव, एकसुरी दिनचर्या आणि तंत्रज्ञानाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी सध्या अनेक तरुण ट्रेकिंगकडे वळताना दिसत आहेत.

+
News18

News18

मुंबई: शहरी धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अनेक तरुण निसर्गाच्या सान्निध्याकडे ओढले जात आहेत. मानसिक तणाव, एकसुरी दिनचर्या आणि तंत्रज्ञानाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी सध्या अनेक तरुण ट्रेकिंगकडे वळताना दिसत आहेत. सह्याद्रीतील डोंगररांगा, गडकोट, धबधबे आणि हिरवाईने नटलेल्या वाटा त्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनल्या आहेत. मात्र ट्रेकिंग सुरू करायचं तरी त्याची सुरुवात कशी करावी हे अनेकांना ठाऊक नसतं.
यावर अनुभवी गिर्यारोहक दिवाकर साटम सांगतात की, ट्रेकिंगची सुरुवात ही सोप्या आणि कमी अवघड टप्प्यांपासून करावी. राजमाची, लोहगड, कर्नाळा, विसापूर यांसारखे ट्रेक नवशिक्यांसाठी योग्य ठरतात. या ट्रेक्समुळे शरीर आणि मनाची तयारी होते आणि आत्मविश्वासही वाढतो. तसेच सुरुवातीला ट्रेक करताना अनुभवी ट्रेकिंग ग्रुपसोबत जायचं ठरवल्यास ते अधिक सुरक्षित आणि मजेदार ठरतं. अशा ग्रुपमध्ये अनुभवी लोक असतात जे नवख्या ट्रेकर्सना योग्य मार्गदर्शन करतात. अनपेक्षित अडचणींमध्ये मदतीचा हात मिळतो आणि ट्रेकचा अनुभव अधिक समृद्ध होतो.
advertisement
तसेच ट्रेकवर जाताना काही मूलभूत तयारी असणं आवश्यक आहे. योग्य ट्रेकिंग शूज, पुरेसं पाणी, हवामानानुसार कपडे आणि प्राथमिक औषधपेटी ही अत्यावश्यक बाबी आहेतच. त्याचबरोबर स्वतःचं ओळखपत्र सोबत ठेवणं आवश्यक आहे, कारण काही वेळा ओळख दर्शवणं गरजेचं ठरू शकतं. मोबाईल वापर करताना त्याची बॅटरी संपणार नाही याची काळजी घ्यावी, म्हणूनच पॉवर बँक बरोबर ठेवावी, असं साटम आवर्जून सांगतात.
advertisement
ट्रेकिंगच्या अनुभवावर बोलताना साटम सांगतात की, ट्रेक म्हणजे केवळ फोटो काढण्याची संधी नव्हे, तर तो निसर्गाशी जोडणारा एक गाढ अनुभव असतो. त्यामुळे ट्रेक करताना प्लास्टिक न टाकणं, पर्यावरणाची विशेष काळजी घेणं आणि स्थानिक लोकांशी सौजन्याने वागणं ही प्रत्येक ट्रेकरची जबाबदारी असते. सामान्य वाटणाऱ्या या गोष्टी लक्षात घेतल्या तर ट्रेकिंगची सुरुवात अधिक सोपी, सुरक्षित आणि संस्मरणीय होऊ शकते.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Travel/
Trekking Tips: पावसाळ्यात ट्रेकिंग बेतू शकते जीवावर? घरातून बाहेर पडण्याआधी हे चेक केलं का?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement