पावसाळ्यात वन-डे ट्रिपला जाताय? मुंबईजवळच्या या पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदी, कारण काय?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Monsoon Tourism: पावसाळ्यात अनेकजण पर्यटनासाठी धबधबे आणि इतर ठिकाणी गर्दी करतात. वसईतील पर्यटनस्थळांवर मात्र पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.
पालघर: पावसाळ्यात वसईतील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी होते. अनेकदा अतिउत्साहामुळे पर्यटकांच्या जीवाला देखील धोका निर्माण होण्याची शक्यता असते. हीच बाब लक्षात घेऊन अतिवृष्टीत पर्यटनस्थळांवर दुर्घटना घडू नये, यासाठी मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने मनाई आदेश काढले आहेत. त्यामुळे पर्यटकांना वसईतील पर्यटनस्थळांवर जाता येणार नाही.
वसईतील कामन, चिंचोटी परिसरात अनेक हौशी पर्यटक फिरायला येतात. या भागातील पर्यटन पूर्णपणे असुरक्षित असून दरवर्षी याठिकाणी पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडतात. त्यादृष्टीने मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने मनाई आदेश लागू केले असून इथे जाणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
वसई तालुक्यातील तुंगारेश्वर, चिंचोटी हे धबधबे पर्यटकप्रिय आहेत. तुंगारेश्वर अभयारण्यातील डोंगराळ भागातील या धबधब्यावर जाण्यास आता बंदी घालण्यात आली आहे. याठिकाणी पर्यटकांनी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मनाई आदेशाचे फलक देखील परिसरात लावण्यात आले आहेत. या मनाईमुळे पर्यटकांना येथून परत जावे लागत असून पालघर, डहाणू येथील पर्यटनस्थळांकडे पर्यटकांचा कल वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
जीवघेणा ठरतोय सेल्फी
या पर्यटनस्थळांवर सेल्फी घेण्यासाठी धोकादायक पद्धतीने स्टंट करताना अनेकांचा मृत्यू झालेला आहे. मनाई आदेश असतानाही काही पर्यटक जिवावर बेतणारे स्टंट करताना दिसत आहेत. त्यामुळे अशा पर्यटकांवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे.
Location :
Palghar,Thane,Maharashtra
First Published :
July 21, 2025 10:39 AM IST
मराठी बातम्या/Travel/
पावसाळ्यात वन-डे ट्रिपला जाताय? मुंबईजवळच्या या पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदी, कारण काय?