advertisement

सुनेत्रा पवारांसोबत शरद पवार यांची पाऊण तास चर्चा, पवार कुटुंबही उपस्थित, काय ठरलं?

Last Updated:

राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याशी शरद पवार यांनी चर्चा केली.

शरद पवार यांनी अजित पवार यांना आदरांजली वाहिली
शरद पवार यांनी अजित पवार यांना आदरांजली वाहिली
जितेंद्र जाधव, प्रतिनिधी, बारामती : बारामती दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतरच्या तीन दिवसांत विलिनीकरणाचा विषय काढून राजकीय घडामोडींना वेग आला होता. या संदर्भात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलीनीकरणासंदर्भात अनेक वेळा चर्चा झाल्याचे शरद पवार यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले होते. आज बारामतीत सहयोग सोसायटीतील निवासस्थानी शरद पवार यांनी भेट देत दिवंगत अजितदादांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले, त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
यानंतर राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याशी शरद पवार यांनी चर्चा केली. यावेळी पार्थ पवार, जय पवार आणि पवार कुटुंबीय देखील उपस्थित होते. पवार कुटुंबात जवळपास अर्धा ते पाऊण तास बैठक झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुढील काळात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा सध्या जोर धरत आहे.
advertisement

शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यात विलिनीकरणावर चर्चा?

सत्तासंघर्षामुळे कुटुंबात फूट पडली, हे बरे नाही. काकांच्या डोळ्यादेखतच दोन्ही पक्षांनी एकत्र यायला पाहिजे, अशी अच्छा अजित पवार यांनी त्यांच्या अनेक जवळच्या सहकाऱ्यांकडे व्यक्त केली होती. केवळ इच्छा व्यक्त करून ते थांबले नाही, तर शरद पवार यांच्याशी बोलून त्यांनी त्यासंदर्भातील पुढची पावले टाकायलाही सुरुवात केली. एकत्रि‍करणाचा पहिला टप्पा म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र लढले. परंतु अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पक्षातील नेत्यांच्या भूमिकेमुळे एकत्रि‍करणाला खीळ बसल्याची चर्चा आहे. याचसंदर्भाने शरद पवार यांनी आज सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे.
advertisement

थरथरत्या हातांनी शरद पवारांचा दादांना नमस्कार

सहयोग सोसायटीतील निवासस्थानाच्या समोर अजित पवार यांचा पुष्पहार घातलेला भलामोठा फोटो लावण्यात आला आहे. शरद पवार यांनी पुष्प वाहून दादांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. ज्यावेळी अजित पवार यांचे दर्शन घेण्याकरिता त्यांनी हात जोडले त्यावेळी पवार कुटुंबातले सगळेच भावुक झाले. सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले. अजित पवार यांच्या भगिनी देखील हुंदक्यांनी दाटल्या. पवार कुटुंबातल्या जावा देखील भावनिक झाल्या होत्या. पवार कुटुंबातल्या या हळव्या क्षणांनी उपस्थित सगळेच भावुक झाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सुनेत्रा पवारांसोबत शरद पवार यांची पाऊण तास चर्चा, पवार कुटुंबही उपस्थित, काय ठरलं?
Next Article
advertisement
Ajit Pawar:  अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा खळबळजनक दावा, ''एका व्यक्तीनं विमानातून...''
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा ख
  • अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाने सगळ्या राज्यालाच मोठा धक्का बसला आहे.

  • ष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विमान अपघात प्रकरणात नवा दावा केला

  • अमोल मिटकरींनी या प्रकरणाला आता 'घातपाता'चे नवे वळण दिले आहे.

View All
advertisement