advertisement

2 वेळा केला प्रयत्न पण टेकऑफ होईनाच! शिवसेना मंत्र्यांच्या विमानाबद्दल धक्कादायक माहिती समोर

Last Updated:

प्रचार सभा आटोपल्यानंतर गुलाबराव पाटील हे जळगावला जाण्यासाठी परत निघाले होते. विमानतळावर गेल्यानंतर खासगी विमानात तांत्रिक बिघाड

News18
News18
शशीकांत पाटील, प्रतिनिधी
लातूर : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघातात निधन झाल्यामुळे विमान वाहतूक यंत्रणेबद्दल प्रश्न चिन्ह उपस्थितीत झाले आहे. एवढंच नाहीतर राष्ट्रवादीच्या आमदारांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. अशातच शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. अखेरीस गुलाबराव पाटील यांना रस्ते मार्गाने प्रवास करावा लागला.
advertisement
राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचार सुरू आहे. शिवसेनेचे नेते आणि  राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे लातूरमध्ये रेणापूर इथं  प्रचारासाठी आले होते. प्रचार सभा आटोपल्यानंतर गुलाबराव पाटील हे जळगावला जाण्यासाठी परत निघाले होते. विमानतळावर गेल्यानंतर खासगी विमानात तांत्रिक बिघाड असल्याची माहिती समोर आली. विमानात दुरुस्तीही करण्यात आली होती.
विमान दोन वेळा धावपट्टीवर नेण्यातही आलं होतं. पण तांत्रिक बिघाडामुळे उड्डाण होऊ शकलं नाही. विमान पायलटने तांत्रिक बिघाड झाल्याचे कारण सांगत टेकऑफसाठी असमर्थता दर्शविल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पी. ए.ने News 18 मराठीला माहिती दिली. त्यामुळे अखेरीस  गुलाबराव पाटील यांना रस्ते मार्गाने जळगावच्या दिशेने रवाना व्हावं लागलं.
advertisement
(सविस्तर बातमी लवकरच)
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
2 वेळा केला प्रयत्न पण टेकऑफ होईनाच! शिवसेना मंत्र्यांच्या विमानाबद्दल धक्कादायक माहिती समोर
Next Article
advertisement
Ajit Pawar:  अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा खळबळजनक दावा, ''एका व्यक्तीनं विमानातून...''
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा ख
  • अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाने सगळ्या राज्यालाच मोठा धक्का बसला आहे.

  • ष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विमान अपघात प्रकरणात नवा दावा केला

  • अमोल मिटकरींनी या प्रकरणाला आता 'घातपाता'चे नवे वळण दिले आहे.

View All
advertisement