Shocking : तोंडाला लावता आणि जंतू गिळता? पाण्याच्या बाटलीत टॉयलेट सीटपेक्षा 40,000 पट जास्त बॅक्टेरिया, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
बहुतांश लोक घराबाहेर पडताना किंवा लांबच्या प्रवासाला जाताना पाण्याची बाटली सोबत ठेवतात. काही लोक ती घरातून आणतात तर काही बाहेर दुकानातून गरजे प्रमाणे विकत घेतात.
मुंबई : पाण्याची गरज आपल्याला नक्कीच भासते. एकवेळ माणूस न खाता राहु शकतो पण पाणी जर शरीराला मिळालं नाही तर मात्र त्याची हालत आणखीच खराब होऊ शकते. त्यामुळे बहुतांश लोक घराबाहेर पडताना किंवा लांबच्या प्रवासाला जाताना पाण्याची बाटली सोबत ठेवतात. काही लोक ती घरातून आणतात तर काही बाहेर दुकानातून गरजे प्रमाणे विकत घेतात.
इथपर्यंत सगळं काही ठिक आहे, पण यानंतर लोक सर्वात मोठी आणि कॉमन चुक करतात. लोक युज एन्ड थ्रो असलेली पाण्याची बाटली पुन्हा पुन्हा वापरतात. काही लोक तर थंडा, कोकची बाटली देखील प्रवासात वारंवार वापरतात.
पण नेमकी हीच सवय आपल्या शरीरासाठी धोकादायक ठरू शकते, असं अलीकडच्या एका अभ्यासातून स्पष्ट झालं आहे.
advertisement
‘वॉटर फिल्टर गुरू’ या अमेरिकन संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार, रीयूजेबल पाण्याच्या बाटल्यांमध्ये टॉयलेट सीटपेक्षा तब्बल 40 हजार पट जास्त बॅक्टेरिया असतात. या बाटल्यांना त्यांनी "पोर्टेबल बॅक्टेरिया हाउस" असं नावच दिलं आहे.
यामध्ये बॅक्टेरिया इतके घातक असतात की अँटीबायोटिक औषधंही त्यांच्यासमोर फेल आहेत. विशेषतः काही बॅक्टेरिया असे असतात की ते पचनसंस्थेवर परिणाम करून गंभीर आजार निर्माण करू शकतात.
advertisement
फक्त धुणं पुरेसं नाही
आपण म्हणतो, की ‘मी बाटली स्वच्छ ठेवतो’, पण अभ्यास असं दाखवतो की ही बाटली स्वच्छ केली, तरी त्यावर किचन सिंकच्या तुलनेत दुप्पट, संगणक माऊसपेक्षा चौपट आणि जनावरांच्या अंगापेक्षा 14 पट जास्त बॅक्टेरिया राहतात.
इम्पीरियल कॉलेज ऑफ लंडनचे डॉ. अँड्र्यू एडवर्ड्स सांगतात की, “या बाटल्यांमुळे माणसाचं तोंड हे किटाणूंसाठी घर बनतं.” कारण पाण्याच्या बाटल्या म्हणजे किटाणूंसाठी प्रजननस्थानच बनते आणि ते अक्षरशः झपाट्याने वाढतात
advertisement
पूर्वी एका संशोधनात हेही निष्पन्न झालं होतं की एका पाण्याच्या बाटलीच्या 1 सें.मी. भागात जवळपास 9 लाख किटाणू असू शकतात. आता पुढ्यावेळी पासून दुकानातील सिंगल युज प्लास्टिकची बाटली वापरताना नक्की विचार करा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 12, 2025 9:22 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Shocking : तोंडाला लावता आणि जंतू गिळता? पाण्याच्या बाटलीत टॉयलेट सीटपेक्षा 40,000 पट जास्त बॅक्टेरिया, संशोधकांचा धक्कादायक खुलासा


