advertisement

Hair : रात्री झोपताना केस मोकळे सोडावेत की वेणी घालावी? 99 टक्के महिला करतात ही चूक, होते केसगळती

Last Updated:

झोपताना काही महिला आपल्या केसांची वेणी घालतात तर काही केस मोकळे ठेवतात. तेव्हा झोपताना केसांची काळजी घेण्याची योग्य पद्धत कोणती याविषयी जाणून घेऊयात.

 रात्री झोपताना केस मोकळे सोडावेत की वेणी घालावी?
रात्री झोपताना केस मोकळे सोडावेत की वेणी घालावी?
केस हे प्रत्येक महिलेसाठी अतिशय महत्वाचे असतात. आपले केस हे लांबसडक, मजबूत आणि घनदाट असावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतू केसांचे आरोग्य आणि त्यांची निगा राखली गेली तरच केसांचे नैसर्गिक सौंदर्य टिकून राहील. झोपताना काही महिला आपल्या केसांची वेणी घालतात तर काही केस मोकळे ठेवतात. तेव्हा झोपताना केसांची काळजी घेण्याची योग्य पद्धत कोणती याविषयी जाणून घेऊयात.
धूळ मातीपासून केसांचे संरक्षण व्हावे यासाठी काहीजण केसांची वेणी घालतात तर कोणी आंबाडा घालतात. तर काहीजण केस मोकळे ठेवून त्याची विविध हेअर स्टाईल करतात. मात्र झोपताना केस मोकळी ठेवावीत की वेणी घालून बांधून ठेवावीत असा प्रश्न अनेकांना पडतो.
तज्ज्ञांच्या मते, जेव्हा व्यक्ती केस मोकळे ठेऊन झोपतात आणि त्यांची केस ही लांबसडक असतील तर त्यात गुंता होण्याची शक्यता असते. सकाळी केसांमधील हा गुंता सोडवताना केस तुटू शकतात, ज्यामुळे केसांचे नुकसान होते. तेव्हा शक्यतो केसांची सैल वेणी घालून झोपावे असा सल्ला तज्ज्ञ देतात.
advertisement
केस बांधून झोपण्याचे फायदे आणि नुकसान : केस बांधून झोपल्याने सकाळी केसांचा गुंता होत नाही. त्यामुळे केस नीट विचारता येतात आणि तुटत नाहीत. तेव्हा केस बांधून झोपणे हा एक उत्तम पर्याय आहे. केस बांधताना ते अतिशय टाईट रबरने बांधू नये. केसांना टाईट रबर बांधल्यामुळे केस ओढली जातात आणि मुळापासून तुटण्याची शक्यता असते.
advertisement
केस मोकळे ठेऊन झोपण्याचे फायदे आणि नुकसान : केस मोकळे ठेऊन झोपल्याने केसांवर ताण येत नाही ज्यामुळे केस गळत नाही. तर केस मोकळे ठेवल्याने त्यात गुंतागुंत होऊ शकते ज्यामुळे केस तुटतात.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hair : रात्री झोपताना केस मोकळे सोडावेत की वेणी घालावी? 99 टक्के महिला करतात ही चूक, होते केसगळती
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement