Saree Shopping: वटपौर्णिमेला नवी साडी घ्याच! मुंबईत इथं मिळेल सगळ्यात स्वस्त, किंमत पाहून नवरा 1 नाही 2 साड्या घेऊन देईल!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
वटपोर्णिमेचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असून महिलांमध्ये पारंपरिक साजशृंगाराची जोरदार तयारी सुरू आहे. विशेषतः विवाहित महिलांसाठी हा सण श्रद्धेचा आणि सौंदर्याचा संगम मानला जात असल्याने, बाजारपेठांमध्ये साड्यांच्या खरेदीला विशेष गती मिळाली आहे.
मुंबई: वटपौर्णिमा 10 जूनला साजरी केली जाणार आहे. महिलांमध्ये पारंपरिक साजशृंगाराची जोरदार तयारी सुरू आहे. विशेषतः विवाहित महिलांसाठी हा सण श्रद्धेचा आणि सौंदर्याचा संगम मानला जात असल्याने, बाजारपेठांमध्ये साड्यांच्या खरेदीला विशेष गती मिळाली आहे. वटपौर्णिमेनिमीत्त तुम्ही लालबाग मार्केटमध्ये साड्यांची खरेदी करू शकता.
वटपौर्णिमा सणाच्या पार्श्वभूमीवर प्रारंभ कलेक्शन याठिकाणी पैठणी, बनारसी, कांजीवरम, डोला सिल्क, मोडाल सिल्क, टिश्यू अशा विविध प्रकारच्या पारंपरिक साड्यांना मोठी मागणी आहे. यंदा या साड्या 1000 रुपयांपासून उपलब्ध होत असल्याने महिलांनाही दर्जेदार पर्याय सहज मिळू लागले आहेत.
advertisement
डोला सिल्क सारख्या नव्या ट्रेंडमध्ये येणाऱ्या साड्यांना महिलांकडून विशेष पसंती मिळत आहे. मखमली झळाळी आणि राजेशाही बॉर्डरमुळे या साड्या सणासुदीच्या लूकसाठी अत्यंत उठावदार ठरतात. याशिवाय मोडाल सिल्क आणि टिश्यू साड्या हलक्या वजनामुळे दिवसभर नेसल्यासही त्रास होत नाही.
बनारसी साड्या, नववधूंसाठी उत्तम पर्याय ठरत असून त्यांची किंमत 5000 रुपयांपासून सुरू होते. तर पूजा विधीसाठी उपयुक्त असलेल्या राग टिश्यू साडीची किंमत 1300 रुपये आहे. महिलांमध्ये विशेष लोकप्रिय ठरणाऱ्या इतर साड्यांमध्ये महेश्वरी साड्या 3000 रुपये, हाथी मोर आणि गायत्री हँडलूम साड्या 1800 रुपयांपर्यंत, पुष्प इरकल 2000 पर्यंत, टिश्यू पैठणी आणि घडी दडी पॅटर्न 3500 पर्यंत तसेच बंगलोर सिल्क लोटस पॅटर्न पैठणी यांचा समावेश आहे. सणासुदीच्या या उत्सवात परंपरेला आधुनिकतेची जोड देणाऱ्या साड्या महिलांसाठी खरेदीचा मुख्य केंद्रबिंदू ठरत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 09, 2025 5:08 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Saree Shopping: वटपौर्णिमेला नवी साडी घ्याच! मुंबईत इथं मिळेल सगळ्यात स्वस्त, किंमत पाहून नवरा 1 नाही 2 साड्या घेऊन देईल!