यापेक्षा स्वस्त कुठे? फक्त 100 रुपयामध्ये करा गरम कपड्यांची खरेदी, मुंबईतलं खास मार्केट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
हिंदमाता परिसरात तिबेटियन व्यावसायिक आपले स्वेटर आणि थंडीची सगळी कपडे विकण्यासाठी येतात. यांची किंमत इथे फक्त 100 रुपयांपासून सुरू होते.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
मुंबई : सध्या मुंबईतील थंडी पुन्हा एकदा परतली आहे. ढगाळ हवामानामुळे मुंबईकर त्रस्त झाले होते, परंतु आता मात्र गुलाबी थंडी परतली आहे. त्यामुळे स्वेटर आणि झिपर अशा गोष्टींची खरेदी करण्यासाठी मुंबईत त्यांची लगबग सुरू झाली आहे. मुंबईत थंडीच्या तीन महिन्यांमध्ये परेलच्या हिंदमाता परिसरात तिबेटियन व्यावसायिक आपले स्वेटर आणि थंडीची सगळी कपडे विकण्यासाठी येतात. यांची किंमत इथे फक्त 100 रुपयांपासून सुरू होते. अगदी लहान बाळांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सगळ्यांचे कपडे इथे मिळतात. यांच्या इथे मिळणारा स्वेटरचा कपडा सुद्धा युनिक आहे.
advertisement
या ठिकाणी तुम्हाला ब्लॅंकेटमध्ये खूप व्हरायटी उपलब्धत आहेत. यामध्ये अगदी डिझायनर ब्लॅंकेटपासून ते प्रिंटेड ब्लॅंकेटपर्यंत सगळं मिळेल. यांची किंमत इथे फक्त 600 ते 700 रुपयांपासून सुरू होते. स्वेटरमध्ये तर तिबेटियन स्पेशल स्वेटर सुद्धा इथे उपलब्ध आहे. हे स्वेटर अत्यंत उबदार असून ते घातल्यानंतर तुम्हाला अजिबातच थंडी वाजणार नाही. अगदी बटनांच्या स्वेटरपासून ते झीपरच्या स्वेटरपर्यंत सगळे प्रकार उपलब्ध आहेत. यांची किंमत इथे फक्त 400 रुपयांपासून सुरू होते. लहान मुलांसाठीचे वेगळे स्वेटर सुद्धा आहेत यामध्ये सुद्धा तुम्हाला स्वेटर आणि त्याखाली पॅन्ट सुद्धा मिळतील.
advertisement
इथे स्वेटर सोबतच तुम्हाला सॉक्स, कान टोपी, हात मोजे असे सगळे प्रकार मिळतील. यांची किंमत फक्त 100 रुपयांपासून सुरू होते. या सगळ्या गोष्टी तुम्हाला नॉर्मल बाजारात किंवा दुकानात मिळणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला इथेच येऊन युनिक आणि सुंदर गोष्टी खरेदी कराव्या लागतील. तुम्हाला जर कुठे बाहेर फिरायला जायचं असेल आणि त्या प्रकारचे जॅकेट्स हवे असतील तर ते सुद्धा इथे उपलब्ध आहेत.
advertisement
मोठ्यांप्रमाणेच लहानग्यांसाठी सुद्धा इथे खूप चांगले ऑप्शन्स आहेत. ऑल सीजन घालण्यासाठी सुद्धा तुम्ही या गोष्टी वापरू शकता. त्यामुळे स्वस्थ दरात चांगल्या दर्जाचे थंडीचे कपडे घेण्याची इच्छा असेल तर आवर्जून दादरमधील हिंदमाता क्लोथ मार्केट समोर, सेंट झेवियर स्ट्रीट इथे असणाऱ्या या तिबेटियन मार्केटला भेट द्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 14, 2024 4:24 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
यापेक्षा स्वस्त कुठे? फक्त 100 रुपयामध्ये करा गरम कपड्यांची खरेदी, मुंबईतलं खास मार्केट







