Gopichand Padlkar : 'तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे असल्या तरी मालक...',पडळकरांची अजित पवारांवर बोचरी टीका
- Reported by:AJIT MANDHARE
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
तिजोरीच्या चाव्या जरी तुमच्याकडे असतील तरी तिजोरीचे मालक आमचे आहेत, अशा शब्दात गोपिचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
Gopichand Padlkar on Ajit Pawar : अंबरनाथ, प्रतिनिधी : 'तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत, निधी मी देतो त्यामुळे घड्याळाला मतदान करा'असे विधान उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या एका प्रचार सभेत केले होते. अजित पवार यांच्या याच विधानाच समाचार आता भाजप नेत्यांनी सूरूवात केली आहे. भाजपने नेते चंद्रकांत पाटील यांच्यानंतर आता आमदार गोपिचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.तिजोरीच्या चाव्या जरी तुमच्याकडे असतील तरी तिजोरीचे मालक आमचे आहेत, अशा शब्दात गोपिचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे झालेल्या एका प्रचार सभेमध्ये गोपीचंद पडळकर यांनी हजेरी लावली होती.यावेळी प्रचार सभेमध्ये बोलताना त्यांनी अजित पवारांवर टीका केली होती. तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत निधी मी देतो त्यामुळे घड्याळाला मतदान करा असं वक्तव्य अजित पवार यांनी एका प्रचार सभेत केलं होतं. या त्यांच्या वक्तव्याला भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्तर देत तिजोरीच्या चाव्या जरी तुमच्याकडे असतील तरी तिजोरीचे मालक आमचे आहेत असं प्रत्युत्तर दिलं होतं. याच अजित पवार यांच्या वक्तव्यावर गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर बोचरी टिका केली आहे.''तिजोरी जरी तुमच्याकडे असली, त्याच्या चाव्या जरी तुमच्याकडे असल्या तरी , तिजोरी ज्या खोलीत आहे आणि तुम्ही ज्या खोलीत राहता त्या खोलीचे मालक आमचे आहेत'' अशा शब्दात आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे.
advertisement
गोपिचंद पडळकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर देखील टीका केली.ज्यांच्या डोळ्यात दोन लाखाचा चष्मा, ज्यांच्या पायात पन्नास हजाराची सँडल, ज्यांच्या काखेत दीड लाखाची पर्स आणि जे मरीन ड्राइवरवर हजार रुपयांची चहा पितात अशा बहिणींसाठी लाडके बहिण योजना नसून ज्या बहिणीला पन्नास रुपये देखील खर्च करायला नसतात त्या बहिणी करता लाडकी पण योजना आहे अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी नाव न घेता सुप्रिया सुळे यांच्यावर केली आहे.
advertisement
तसेच अंबरनाथमध्ये माझी सभा आहे. म्हणून सभेला कोणी जायचं नाही अशा धमक्या इथल्या मतदारांना दिल्या गेल्या होत्या. हे भाजपचे सरकार आहे, आमचे सरकार आहे तिथे लोकशाही आहे कोणाची मोगलाई लागून गेली नाही त्यामुळे अंबरनाथ मध्ये भयमुक्त वातावरण करायचे असेल तर भाजपला निवडून द्या असा आव्हान यावेळी त्यांनी अंबरनाथकरांना केले आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Nov 29, 2025 4:38 PM IST
मराठी बातम्या/Local Body Elections/
Gopichand Padlkar : 'तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे असल्या तरी मालक...',पडळकरांची अजित पवारांवर बोचरी टीका









