हे पुण्यातच होऊ शकतं! Valentine Day च्या दिवशी इतक्या जोडप्यांचं कोर्ट मॅरेज
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Valentines Day: व्हॅलेंटाईन डेला पुण्यात तरुणाईचा जल्लोष दिसला. तर विवाह नोंदणी कार्यालयात मात्र थेट शुभमंगल सावधान करण्यासाठी गर्दी झाली होती.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे:- सध्या जगभरात व्हॅलेंटाईन विक सुरू असून या काळात विविध डे साजरे केले जातात. आज 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. या दिवशी तरुण तरुणी एकमेकांना गुलाबाचा फुल देऊन प्रेम व्यक्त करत असतात. पुण्यात मात्र हे सगळं घडत असताना व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर थेट लग्नासाठी गर्दी झालीये. पुण्यातील विवाह नोंदणी कार्यालयात आज एकाच दिवशी तब्बल 35 जोडपी विवाहबंधानत अडकली आहेत. याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
सध्या विवाह नोंदणी कार्यालयाचे कामकाज हे ऑनलाईन स्वरूपात झाले आहे. एका दिवशी 35 लग्नाचे स्लॉट उपलब्ध असतात आणि एका आठवड्यापूर्वीच व्हॅलेंटाईन डे म्हणजेच 14 फेब्रुवारीचे सर्व स्लॉट बुक झाले आहेते. या दिवशी आमच्या कार्यालयात 35 जोडप्यांचे विवाह झाले. व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा दिवस असतो आणि या दिवशी दरवर्षी मोठ्या संख्येने जोडपी लग्न करत असतात. यंदा देखील तोच ट्रेंड दिसला, असं विवाह नोंदणी कार्यालय प्रमुख संगीता जाधव यांनी सांगितलं.
advertisement
कार्यालयात रांगोळी काढून लग्नासाठी येणाऱ्या जोडप्यांचे स्वागत करत आहोत. तसेच आम्ही इथ सेल्फी पॉइंट देखील उभा केला आहे. प्रेमाचा दिवस असणाऱ्या या दिवशी जोडप्यांचं प्रेमाने स्वागत करत आहोत. सध्या सर्व प्रक्रिया ही ऑनलाईन झाली असल्याने एकाच दिवशी 35 स्लॉट उपलब्ध आहेत. त्यामुळे या दिवशी कार्यालयात 35 जोडप्यांचे लग्न होत आहे. जेव्हा ऑफलाईन पद्धत होती तेव्हा आमच्या इथ जवळपास 50 जोडपे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी लग्न करत होते, असंही जाधव यांनी सांगितलं.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
February 14, 2025 7:31 PM IST
मराठी बातम्या/लव स्टोरी/
हे पुण्यातच होऊ शकतं! Valentine Day च्या दिवशी इतक्या जोडप्यांचं कोर्ट मॅरेज