SSC Board Result 2025 : आज दहावीचा निकाल, कुठे आणि कसा पाहायचा रिजल्ट? A टू Z माहिती एका क्लिकवर
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
SSC Board Live Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेच्या निकाल आज मंगळवारी जाहीर होणार आहे.
SSC Board Live Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेच्या निकाल आज मंगळवारी जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजता हा निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळाला भेट देत ऑनलाइन पद्धतीने पाहता येणार आहे. या वर्षी एकूण १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यात ८ लाख ६४ हजार १२० मुले आणि ७ लाख ४७ हजार ४७१ मुलींचा समावेश होता. त्याचबरोबर १२ तृतीयपंथीयांनी देखील यंदा दहावीची परीक्षा दिली होती. आज या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल लागणार आहे. त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे.
10 वी च्या बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष
अलीकडेच बारावीचा निकाल 5 मे 2025 रोजी लागला होता. आता सगळ्यांचे लक्ष 10 वी च्या बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाकडे लागले होते. बारावीचा निकाल लवकर लागल्यामुळं पदवी प्रवेश प्रक्रिया देखील लवकर सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे, दहावीचा निकाल उद्या लागल्यानंतर लगेच अकरावीची प्रवेश प्रक्रिया देखील सुरू होणार आहे.
advertisement
निकाल कुठे पाहायचा?
https://results.digilocker.gov.in
https://mahahsscboard.in
http://sscresult.mkcl.org
https://mahahsscboard.in
निकाल कसा पाहायचा?
- सर्वप्रथम शिक्षण मंडळाकडून निकाल प्रसिद्ध केलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
- तिथे गेल्यावर 'SSC Examination Result 2025' या लिंकवर क्लिक करा.
- समोर दिसणाऱ्या रकान्यात आपला सीट नंबर आणि आईचे पहिले नाव टाका.
- त्यानंतर 'Submit' बटणवर क्लिक करा
- त्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला तुमचा रिजल्ट दिसेल, तिथून तुम्हाला निकालाची पीडीएफ फाईल डाऊनलोड करता येईल. किंवा तुम्ही स्क्रीन शॉटही काढू शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 13, 2025 7:38 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
SSC Board Result 2025 : आज दहावीचा निकाल, कुठे आणि कसा पाहायचा रिजल्ट? A टू Z माहिती एका क्लिकवर