Independence Day: राज्यातील 15 सरपंचांना विशेष मान, लाल किल्ल्यावर मिळालं आमंत्रण
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Independence Day: दरवर्षी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांना लाल किल्ल्यावर आमंत्रित केलं जातं. यावर्षी संपूर्ण देशभरातील 210 ग्रामपंचाय सरपंचांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे.
नवी दिल्ली: येत्या 15 ऑगस्ट (शुक्रवार) रोजी आपल्या देशाचा 79वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा सोहळा महाराष्ट्रासाठी विशेष ठरणार आहे. कारण, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील 15 सरपंचांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे. 15 सरपंचांमध्ये 9 महिला सरपंचांचा समावेश आहे. राज्यातील 15 गावांचे प्रमुख हे लाल किल्ल्यावरील सोहळ्याच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरणार आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजना आपापल्या गावांमध्ये प्रभावीपणे राबवल्याबद्दल देशभरातील 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 210 ग्रामपंचायत सरपंचांना यंदा विशेष पाहुण्यांचा मान देण्यात आला आहे. केंद्रीय पंचायतराज मंत्री ललन सिंह, केंद्रीय राज्य मंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल आदींच्या हस्ते गुरूवारी या विशेष पाहुण्यांचा दिल्लीत सत्कार होणार आहे. सत्कार सोहळ्यादरम्यान आर्टिफिशिअल इंटिलिजन्सवर (एआय) आधारित 'सभा सार' नावाच्या अॅपचं लाँचिंग आणि 'ग्रामोदय संकल्प' मासिकाच्या विशेषांकाचं प्रकाशन देखील होणार आहे.
advertisement
स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी आमंत्रण मिळालेले सरपंच
संजीवनी वैजनाथ पाटील (खर्डा, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर), चंद्रकुमार काशीराम बहेकार (भेजपार, ता. सालेकसा, जि. गोंदिया), रोमिला रामेश्वर बिसेन (केसलवाढा/पवार, ता. लाखनी, जि. भंडारा), सूरज संतोष चव्हाण (चिंचाळी, ता. दापोली, जि. रत्नागिरी), पार्वती शेषराव हरकल (कुंभारी, ता. जिंतूर, जि. परभणी), प्रमोद किसन जगदाळे (बिदल, ता. मान, जि. सातारा), शशिकांत माधवराव मांगले (कसबेगव्हाण, ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती), प्रभावती राजकुमार बिराजदार (बामणी, ता. उदगीर, जि. लातूर), प्रमोद नरहरी लोंढे (लोंढेवाडी, ता. माढा, जि. सोलापूर), जयश्री धनंजय इंगोले (खासळा नाका, ता. कामठी, जि. नागपूर), संदीप पांडुरंग ढेरंगे (कोरेगाव भीमा, ता. शिरूर, जि. पुणे), डॉ. अनुप्रिता सचिन भांडे (म्हातोडी, ता. अकोला, जि. अकोला), नयना अशोक भुसारे (भावसे, ता. शहापूर, जि. ठाणे), सुनीता दत्तात्रय मिटकरी (ढोरखेडा, ता. मालेगाव, जि. वाशिम), अपर्णा नितीन राऊत (कोंढाळा, ता. देसाईगंज, जि. गडचिरोली).
Location :
New Delhi,New Delhi,Delhi
First Published :
August 14, 2025 9:32 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Independence Day: राज्यातील 15 सरपंचांना विशेष मान, लाल किल्ल्यावर मिळालं आमंत्रण