ठाण्यात कारमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार, कोर्टाच्या आवारातच घृणास्पद प्रकार, दोघांनी गुंगीचं औषध देत...
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Thane News: ठाणे फॅमिली कोर्टाच्या आवारात उभ्या असलेल्या कारमध्ये एका महिलेवर दोन जणांनी सामूहिक अत्याचार केला आहे
ठाणे शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. ठाणे फॅमिली कोर्टाच्या आवारात उभ्या असलेल्या कारमध्ये एका महिलेवर दोन जणांनी सामूहिक अत्याचार केला आहे. आरोपींनी महिलेला केकमधून गुंगीचे औषध देऊन हे घृणास्पद कृत्य केल्याचं तक्रारीत नमूद केलं आहे.
ही घटना २५ ऑगस्ट रोजी घडली होती. पीडित महिलेने बदनामीच्या भीतीपोटी सुरुवातीला तक्रार दाखल केली नव्हती. मात्र, घटनेनंतर आरोपींकडून तिला वारंवार ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न सुरू होता. या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने हिंमत दाखवत ५ डिसेंबर रोजी ठाणे नगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, फॅमिली कोर्टाच्या आवारात चारचाकी वाहनात हिरालाल केदार आणि रवी पवार या दोन आरोपींनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला. अत्याचार करण्यापूर्वी आरोपींनी पीडित महिलेला केकमधून गुंगीचे औषध मिसळून खायला दिलं होतं, ज्यामुळे ती बेशुद्ध झाली.
advertisement
पीडितेच्या तक्रारीवरून ठाणे नगर पोलिसांनी सामूहिक अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एकाला, म्हणजे हिरालाल केदार याला पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. तर, दुसरा आरोपी रवी पवार हा अद्याप फरार असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. कोर्टाच्या आवारातच अशा प्रकारची गंभीर घटना घडल्याने ठाण्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू केला आहे.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
December 07, 2025 11:16 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ठाण्यात कारमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार, कोर्टाच्या आवारातच घृणास्पद प्रकार, दोघांनी गुंगीचं औषध देत...


