आई सुनेला भेटायला मुंबईला गेली अन् घरी असलेल्या 28 वर्षांच्या प्रिशाच्या कृत्याने गाव हादरलं, दापोलीतील घटना
- Published by:Sachin S
Last Updated:
प्रिशा ही गेल्या सुमारे दोन वर्षांपासून माहेरी गिम्हवणे उगवतवाडी येथे तिची आई प्रतिभा परशुराम मोरे यांच्यासोबत वास्तव्यास होती
शिवाजी गोरे, प्रतिनिधी
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दापोली तालुक्यात एका विवाहितेनं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृत तरुण विवाहिता मागील दोन वर्षांपासून आईकडे राहण्यासाठी आली होती. तिने इतक्या टोकाचं पाऊल उचलल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यातील गिम्हवणे उगवतवाडी इथं ही घटना घडली. प्रिशा सुदेश वाडकर (वय २८, विवाहपूर्व नाव पूनम परशुराम मोरे) असं मृत महिलेचं नाव आहे. या प्रकरणाची नोंद दापोली पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रिशा ही गेल्या सुमारे दोन वर्षांपासून माहेरी गिम्हवणे उगवतवाडी येथे तिची आई प्रतिभा परशुराम मोरे यांच्यासोबत वास्तव्यास होती. काही दिवसांपूर्वी प्रतिभा मोरे या आपल्या सुनेच्या बाळंतपणानिमित्त मुंबई इथं गेल्या होत्या. त्यामुळे प्रिशा घरात एकटीच राहत होती.
advertisement
सोमवार दिनांक ५ जानेवारी रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास प्रिशा राहत असलेल्या इमारतीच्या शेजारील विहिरीत एक महिला पाण्यावर उलट्या अवस्थेत तरंगताना दिसल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. तातडीने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत प्रिशा हिला विहिरीबाहेर काढलं. त्यानंतर तिला त्वरित रुग्णवाहिकेतून दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केलं.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. तरुण विवाहितेच्या अकाली मृत्यूने परिसरात शोककळा पसरली असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
view commentsLocation :
Dapoli Camp,Ratnagiri,Maharashtra
First Published :
Jan 06, 2026 6:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आई सुनेला भेटायला मुंबईला गेली अन् घरी असलेल्या 28 वर्षांच्या प्रिशाच्या कृत्याने गाव हादरलं, दापोलीतील घटना









