मिरा भाईंदर महापालिकेचं वातावरण तापलं, 'बजरंगी भाईजान'नं नरेंद्र मेहतांचं सगळंच काढलं, भ्रष्टाचाराची 'लंका' जाळणार!
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
प्रताप सरनाईक यांनी स्वत:ला ‘बजरंगी भाईजान’ असे संबोधत भ्रष्टाचाराची ‘लंका’ जाळणार असल्याचे विधान करत नरेंद्र मेहता यांच नाव न घेता त्याच्यावर हल्ला चढवला आहे.त्याचसोबत प्रताप सरनाईक यांनी यावेळी नरेंद्र मेहता यांच्या गुन्हेगारीची देखील माहिती दिली.
Mira Bhayander Municipal corporation Election 2026 : दिपाली मिश्रा, प्रतिनिधी,मिरा-भाईंदर : मिरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती तुटल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक आणि भाजप नेते नरेंद्र मेहता यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप सूरू आहेत. या आरोप प्रत्यारोपात आता प्रताप सरनाईक यांनी स्वत:ला ‘बजरंगी भाईजान’ असे संबोधत भ्रष्टाचाराची ‘लंका’ जाळणार असल्याचे विधान करत नरेंद्र मेहता यांच नाव न घेता त्याच्यावर हल्ला चढवला आहे.त्याचसोबत प्रताप सरनाईक यांनी यावेळी नरेंद्र मेहता यांच्या गुन्हेगारीची देखील माहिती दिली.
advertisement
खरं तर मंत्री प्रताप सरनाईक यांची पत्रकार परिषद पार पडली.या पत्रकार परिषदेत प्रताप सरनाईक यांनी नरेंद्र मेहता यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 20 जून 2025 रोजी भू-माफिया नरेंद्र मेहता यांच्याविरोधात मनी लॉन्डरिंग (महसूल कायदा) अंतर्गत ‘सेवन इलेव्हन’ कंपनीकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात तत्कालीन मंत्री चंद्रशेखर बावनकुले यांचाही उल्लेख होत असल्याचे प्रताप सरनाईक यांनी नमूद केले.
advertisement
नरेंद्र मेहता यांच्यावर 52 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असून, याची माहिती स्वतः मेहता यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात (अॅफिडेव्हिट) दिली आहे. असे असतानाही भाजपने त्यांना उमेदवारी देणे हे अत्यंत दुर्दैवी असून हे लोकशाहीसाठी घातक असल्याची टीका प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
advertisement
नरेंद्र मेहता यांनी गंभीर गुन्ह्यांत आरोपी असलेल्या व्यक्तींनाही आपल्या पक्षातून उमेदवारी दिल्याचा आरोप प्रताप सरनाईक यांनी केला. बलात्काराच्या गुन्ह्यात नोंद असलेल्या काही व्यक्तींना तसेच पाच वर्षांची शिक्षा झालेल्या नगरसेविका वर्षा भानुशाली यांनाही तिकीट देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अशा अनेक वादग्रस्त व्यक्तींना निवडणुकीच्या मैदानात उतरवून मेहता यांनी राजकारणाची पातळी खालावल्याचा आरोप प्रताप सरनाईक यांनी केला आहे.
advertisement
तसेच भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीविरोधात आपली लढाई सुरूच राहील, असे ठामपणे सांगत प्रताप सरनाईक यांनी जनतेला सत्य समजेल, असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान आता प्रताप सरनाईक यांच्या या आरोपावर आता नरेंद्र मेहता काय उत्तर देतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
advertisement
Location :
Mira-Bhayandar,Thane,Maharashtra
First Published :
Jan 06, 2026 7:03 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मिरा भाईंदर महापालिकेचं वातावरण तापलं, 'बजरंगी भाईजान'नं नरेंद्र मेहतांचं सगळंच काढलं, भ्रष्टाचाराची 'लंका' जाळणार!









