वाटाण्याची भाजी खाऊन कंटाळा आलाय? घरीच बनवा क्रिस्पी कटलेट, सोपी रेसिपी
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Mohan Najan
Last Updated:
विशेषतः लहान मुलांना वाटाण्याची भाजी फारशी आवडत नाही पण त्याच वाटाण्यापासून जर कुरकुरीत, चवदार आणि स्नॅकसारखा पदार्थ बनवला तर मात्र सगळेच खुश होतात.
मुंबई : सध्या बाजारात ताज्या हिरव्या वाटाण्याची रेलचेल पाहायला मिळते आहे. आपण वाटाण्याची भाजी, आमटी आणि उसळ हेच बनवतो पण रोज रोज तेच पदार्थ खाऊन अनेकदा घरातले सगळेच कंटाळतात. विशेषतः लहान मुलांना वाटाण्याची भाजी फारशी आवडत नाही पण त्याच वाटाण्यापासून जर कुरकुरीत, चवदार आणि स्नॅकसारखा पदार्थ बनवला तर मात्र सगळेच खुश होतात. तर आज आपण पाहणार आहोत कमी साहित्य वापरून झटपट तयार होणारे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे क्रिस्पी मटार कटलेट.
क्रिस्पी मटार कटलेट साहित्य (2–3 जणांसाठी):
उकडलेले हिरवे वाटाणे – 1 कप
उकडलेला बटाटा – 3-4 मध्यम
बेसन – 2 चमचे
कॉर्नफ्लावर – 2 चमचे
हिरवी मिरची – 1 (बारीक चिरलेली)
आले-लसूण पेस्ट – 1 चमचा
लाल तिखट – चवीनुसार
मीठ – चवीनुसार
कोथिंबीर – थोडी (चिरलेली)
तेल – तळण्यासाठी
क्रिस्पी मटार कटलेट कृती:
उकडलेले वाटाणे आणि बटाटा एका भांड्यात व्यवस्थित कुस्करून घ्यावेत. त्यात हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट, सर्व मसाले, मीठ आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करावे. आता या मिश्रणाचे छोटे कटलेट बनवून गरम तेलात मध्यम आचेवर सोनेरी आणि क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यावेत. हे कटलेट टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा. संध्याकाळच्या चहासाठी किंवा टिफिनसाठीही हा उत्तम पर्याय आहे.
advertisement
टिप: कटलेट अजून हेल्दी हवे असतील तर shallow fry किंवा एअर फ्रायरमध्येही बनवू शकता.
15 मिनिटांत तयार होणारी, चवदार आणि पौष्टिक अशी ही क्रिस्पी मटार कटलेट रेसिपी नक्की करून पाहा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 06, 2026 7:02 PM IST










