advertisement

Pandharpur: 5 वर्षांच्या प्रज्वल आई आणि वडिलांसोबत घरी परतलाच नाही, शेतातलं दृश्य पाहून गाव हादरलं, पंढरपूरमधील घटना

Last Updated:

पंढपूर तालुक्यातील कोर्टी गावामध्ये शेततळ्यात ही घटना घडली. विजय लोंढे, प्रियांका लोंढे आणि 5 वर्षीय प्रज्वल लोंढे अशी

News18
News18
विरेंद्र उत्पात, प्रतिनिधी 
पंढरपूर: पंढपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. घराजवळच्या शेततळ्यामध्ये बुडून आई, वडिल आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. एकाच वेळी तिघांचा बुडून मृत्यू झाल्यामुळे दुर्घटना घडली की आत्महत्या आहे, असा संशयही व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंढपूर तालुक्यातील कोर्टी गावामध्ये शेततळ्यात ही घटना घडली. विजय लोंढे, प्रियांका लोंढे आणि 5 वर्षीय प्रज्वल लोंढे अशी तिघांची पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तिघांची नावं आहे. कोर्टी गावात लोंढे कुटुंबीय राहत होतं. त्यांच्या घराच्या जवळच एक शेत तळं आहे. दुपारच्या सुमारास त्यांचा मुलगा प्रज्वल शेतात खेळत होता. पण, बराच वेळा झाला विजय लोंढे आणि प्रियांका लोंढे आपल्या मुलासह घरी आले नाही. त्यामुळे घरातील इतर सदस्यांनी शेततळ्याजवळ जाऊन पाहिले असता तिघांचे मृतदेह शेततळ्यात आढळून आले.
advertisement
घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. शेजारी आणि गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती पंढरपूर ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळतात घटनास्थळी पोलीस दाखल झाले. विजय लोंढे, प्रियांका लोंढे आणि ५ वर्षांच्या प्रज्वलचा मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढण्यात आला. तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार,  शेततळ्यात पाण्याचा अंदाज न आल्याने पती-पत्नी आणि लहान मुलाचा बुडून मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेचा अधिक तपास पंढरपूर पोलीस करत आहे. या घटनेमुळे गावावर मात्र शोककळा पसरली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pandharpur: 5 वर्षांच्या प्रज्वल आई आणि वडिलांसोबत घरी परतलाच नाही, शेतातलं दृश्य पाहून गाव हादरलं, पंढरपूरमधील घटना
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement