छ. संभाजीनगरच्या चिमुरडीने सिलंबममध्ये केला वर्ल्ड रेकॉर्ड, एका मिनिटात फिरवली 'इतक्या' वेळ काठी
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
छत्रपती संभाजीनगर शहरातील रिद्धी तोष्णीवाल या चिमुकलीने सिलंबममध्ये वर्ल्ड रेकॉर्ड तयार केलेला आहे. अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीने फक्त दहा महिन्यांमध्ये तिने हा रेकॉर्ड केलेला आहे.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातील रिद्धी तोष्णीवाल या चिमुकलीने सिलंबममध्ये वर्ल्ड रेकॉर्ड तयार केलेला आहे. अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीने फक्त दहा महिन्यांमध्ये तिने हा रेकॉर्ड केलेला आहे. तिने एक मिनिटा मध्ये 114 वेळा दोन्ही हाताने काठी फिरवत सिलंबममध्ये रेकॉर्ड तयार केलेला आहे. रिद्धीने गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड हा रेकॉर्ड केलेला आहे.
रिद्धीच्या आई-वडिलांनी लहान असतानाच रिद्धी आणि तिची बहीण सिद्धी या दोघींना सेल्फ डिफेन्सचे क्लासेस लावले होते. त्या ठिकाणी रिद्धीने प्रशिक्षकांना एकदा काठी फिरवताना बघितलं. त्यानंतर घरी आल्यानंतर तिने वडिलांना सांगितलं की, "मला देखील सरांसारखे करायचे आहे. त्यानंतर तिच्या सरांनी तिला देखील काठी चालवायला शिकवलं. सुरुवातीला रिद्धी फक्त एका हाताने काठी फिरवत होती. पण तिच्या वडिलांना आणि शिक्षकांना असं लक्षात आलं की, ती एकाचवेळी दोन्हीही हाताने काठी फिरवू शकते. त्यानंतर तिला त्या प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आलं आणि फक्त तीन ते चार महिन्याच्या प्रॅक्टिस मध्येच तिने हा रेकॉर्ड केलेला आहे."
advertisement
"रिद्धीने 1 मिनिटामध्ये 144 वेळा काठी फिरून हा रेकॉर्ड केलेला आहे. रिद्धीने हा जो रेकॉर्ड केलेला आहे, त्यामुळे आम्हाला रिद्धीचा खूप अभिमान आहे. भविष्यामध्ये तिनं असेच रेकॉर्ड करत राहावे अशी आमची इच्छा आहे. त्यासोबतच तिची बहीण सिद्धीने देखील रेकॉर्ड करावा अशी आमची इच्छा आहे," अशी रिद्धीची आई म्हणाली आहे. "मला बघून रिद्धी काठी चालवायला शिकलीये. तिने हा रेकॉर्ड केलाय यामुळे मला तिचा खूप अभिमान आहे. भविष्यामध्ये तिने देखील खूप मोठे व्हावे अशी माझी इच्छा आहे", अशी तिचे प्रशिक्षक प्रथमेश पुसे म्हणाले आहेत.
Location :
Maharashtra
First Published :
November 05, 2025 8:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
छ. संभाजीनगरच्या चिमुरडीने सिलंबममध्ये केला वर्ल्ड रेकॉर्ड, एका मिनिटात फिरवली 'इतक्या' वेळ काठी

