Mumbai: वेदनांनी दिवसरात्र छळलं! मुंबईच्या डॉक्टरांनी दिलं जीवदान, मॉरिशसच्या तरुणीने मानले आभार
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Mumbai: एका मॉरिशसच्या तरुणीला मुंबईतील डॉक्टरांनी जीवघेण्या वेदनांपासून मुक्ती दिली आहे.
मुंबई: आपल्या राज्यातील वैद्यकीय क्षेत्राने पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मुंबईतील प्रसिद्ध जसलोक हॉस्पिटलमध्ये एका मॉरिशसच्या तरुणीला जीवघेण्या वेदनांपासून मुक्ती मिळाली आहे. 24 वर्षांची तरुणी 16 वर्षांपासून क्रॉनिक वेदना (Chronic Pain) सहन करत होती. मात्र, जसलोक हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या प्रयत्नांनी तिला या वेदनांपासून आराम मिळाला आहे. यामुळे तरुणीने डॉक्टरांचे आभार मानले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मॉरिशसमधील ग्रँड पोर्ट येथील तरुणी आठ वर्षांची असताना तिला पोटदुखी झाली होती. तपासणी केली असता तिला इरिटेबल बोल सिंड्रोम, फायब्रोमायल्जिया, लेझी ब्लॅडर सिंड्रोम आणि पोटाच्या इतर आजारांचं निदान झालं होतं. तिच्यावर पाच मोठ्या शस्त्रक्रिया देखील झाल्या होत्या. तरी देखील तिला दररोज प्रचंड वेदना सहन कराव्या लागत होत्या.
advertisement
Indore Manmad Railway: मुंबई ते इंदूर प्रवासात तब्बल 5 तासांची बचत होणार! कोणत्या जिल्ह्यांना मिळणार फायदा?
जसलोक हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉरिशसमधून आलेली तरुणी सेंट्रल सेन्सिटायझेशन सिंड्रोमने त्रस्त होती. या स्थितीत व्यक्तीला अस्तित्वात असलेल्या वेदनांपेक्षा अतिरिक्त वेदना जाणवतात. व्यक्ती वेदनेतून बाहेरच येऊ शकत नाही. त्यामुळे या तरुणीवर एका महिन्यापासून डीप टीएमएस (ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन) सुरू आहे. या प्रक्रियेत मेंदूच्या आतील भागात चुंबकीय पल्सेस पोहोचवल्या जातात. मेंदूला मिळालेल्या उत्तेजनामुळे तिला होणाऱ्या वेदनांची तीव्रता कमी होत आहे. या तरुणीवर आता डीबीएस सर्जरी केली जाणार आहे.
advertisement
या तरुणीने आपल्या उपचारांसाठी क्राउडफंडिंगच्या माध्यमातून पैसे जमा केले आहेत. या सर्जरीमुळे भविष्यात आपला त्रास आणखी कमी होईल आणि तिला तिचे शिक्षण पूर्ण करता येईल, अशी आशा मॉरिशसमधून आलेल्या या तरुणीने व्यक्त केली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 21, 2025 11:01 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai: वेदनांनी दिवसरात्र छळलं! मुंबईच्या डॉक्टरांनी दिलं जीवदान, मॉरिशसच्या तरुणीने मानले आभार