मराठवाड्यात वारं फिरलं, नवरात्र गाजवणार पाऊस, 10 जिल्ह्यांसाठी IMD कडून अलर्ट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा जोर कायम असून हवामान खात्याने पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन.
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात परतीच्या पावसाने जोर धरला आहे. रविवारी संध्याकाळपासून सुरू झालेला पाऊस अनेक भागात अजूनही कायम असून, हवामान खात्याने पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सध्या पावसाची स्थिती पाहता हा पाऊस नवरात्रही गाजवणार असं दिसत आहे. मराठवाड्यात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मराठवाड्यापासून खाली अरबी समुद्र आणि दक्षिण भारताकडे जे वारे वाहात आहेत त्यामुळे मुसळधार पाऊस येत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. आज पहाटेपासून मुंबईसह उपनगरात रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. कोकण विभागात पावसाचा जोर काहीसा ओसरलेला दिसून येत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार नाशिक, अहिल्यानगर, घाटमाथा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, लातूर, जालना, हिंगोली, नागपूर, नंदूरबार आणि वर्धा या 10 जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विजांच्या कडकडाटासह आणि वाऱ्यांच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
advertisement
विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह 40 किमी ताशी वेगाने वारे वाहतील आणि मुसळधार पाऊस पडेल असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी असं आवाहन केलं आहे. खरंतर 15 सप्टेंबरपासून मान्सूच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात व्हायला हवी होती. मात्र मराठवाड्यात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पुन्हा एकदा मुसळधार पावसाचं संकट आहे.
advertisement
वातावरणात अचानक बदल होत असून कधी अति मुसळधार तर कधी रिमझिम पाऊस अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार 15 ऑक्टोबरपर्यंत पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पावसाचा जोर कमी होईल. तर स्कायमेट आणि अमेरिकेतील एक हवामान केंद्राने दिलेल्या वृत्तानुसार यावर्षी ला नीनाचा इफेक्ट असल्याने अति थंडी आणि अति उकाडा राहण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 19, 2025 6:38 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मराठवाड्यात वारं फिरलं, नवरात्र गाजवणार पाऊस, 10 जिल्ह्यांसाठी IMD कडून अलर्ट