Guess Who : 'या अभिनेत्रीला घेऊ नका...', शाहरुख खानची हिरोईन, B Grade फिल्म्स करून झाली उद्ध्वस्त

Last Updated:
Bollywood Actress Controversy : या अभिनेत्रीने शाहरुख खान आणि माधुरी दीक्षितसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम केलं, पण नंतर तिच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले.
1/9
मुंबई: बॉलिवूडमध्ये अनेक अशा अभिनेत्री आहेत, ज्यांनी मोठ्या कलाकारांसोबत काम केलं, पण तरीही एक वेळ अशी आली की त्या हळूहळू पडद्यावरून गायब झाल्या.

advertisement
2/9
सोशल मीडिया आणि ओटीटीच्या जमान्यात काही कलाकारांना पुन्हा एक नवीन संधी मिळाली. पण, अभिनेत्रींसाठी हा संघर्ष अजूनही सोपा नाही.

3/9
आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, जिने शाहरुख खान आणि माधुरी दीक्षितसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम केलं, पण नंतर तिच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले.

4/9
अभिनेत्री दीपशिखा नागपाल हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील अनेक रहस्यांवरून पडदा उचलला आहे. तिने तिच्या कामातील संघर्ष आणि घटस्फोटाबद्दलही सांगितलं. दीपशिखा म्हणाली की, तिला खरं तर अभिनेत्रीच व्हायचं नव्हतं, पण नियतीने तिला या क्षेत्रात आणलं.

5/9
ती म्हणाली, “माझ्यासाठी घटस्फोटाचा काळ खूप कठीण होता, पण माझ्या कामामुळे आणि अभिनयामुळे मी त्यातून बाहेर पडले. मी माझ्या कामावर खूप प्रेम करते. माझ्या आजोबांनी मला एक गोष्ट सांगितली होती की, जेव्हा तुम्ही काम करता, तेव्हा तुमच्या घरातील समस्या कामावर घेऊन जाऊ नका आणि कामातील समस्या घरी घेऊन येऊ नका.”

6/9
दीपशिखा म्हणाली, “मी ठरवलं होतं की, मी कधीच काम सोडणार नाही, कारण लोक तुम्हाला खूप लवकर विसरतात. ते तुमचा पर्याय शोधतात. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहणं खूप महत्त्वाचं आहे.”

7/9
दीपशिखा नागपालने तिच्या कारकिर्दीत अनेक मोठे चित्रपट साईन केले होते, पण नंतर तिला बी-ग्रेड चित्रपटांमध्ये काम करावं लागलं. ती म्हणाली, “जेव्हा लोकांना माझ्या बी-ग्रेड चित्रपटांचे पोस्टर दिसले, तेव्हा त्यांनी लगेचच माझ्याबद्दल एक मत बनवलं.”

8/9
ती म्हणाली, “त्यांनी मला चित्रपटांमध्ये काम देणं बंद केलं. लोक म्हणायचे की, ‘या अभिनेत्रीला घेऊ नका, त्याचा परिणाम आपल्या चित्रपटावर होईल.’ तेव्हा मला समजलं की, माझं खूप मोठं नुकसान झालं आहे.”

9/9
शेवटी, दीपशिखा नागपाल म्हणाली, “मी पैसे कमावत होते. पैशांमुळे तुम्ही खूप काही सोडवू शकता. रिक्षात रडण्यापेक्षा तुम्ही मर्सिडीजमध्ये रडा. कठीण परिस्थिती तुम्हाला एका कोपऱ्यात घेऊन जाते, पण त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला खूप हिंमत लागते.”

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement