अरबी समुद्रातून घोंगावतंय संकट! 48 तास राज्यासाठी महत्त्वाचे, हवामान विभागाने दिली महत्त्वाचे माहिती
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
महाराष्ट्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता; कोकण, पुणे, सातारा, नाशिक, विदर्भ व मराठवाड्यात सतर्कता आवश्यक.
महाराष्ट्रासह गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यालगत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, पुढील पाच दिवस महाराष्ट्रात कमी-अधिक प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या हवामान बदलांमुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. सध्या अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात एकाच वेळी दोन महत्त्वपूर्ण हवामान प्रणाली कार्यरत आहेत.
गुजरात-महाराष्ट्र किनारी कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, गुजरातच्या किनाऱ्यावर तयार झालेला हा कमी दाबाचा पट्टा हळूहळू महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. टर्फ लाईनची भूमिका यामध्ये महत्त्वाची आहे. पुढचे 48 तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांवरून एक टर्फ लाईन म्हणजेच कमी दाबाची रेषा पुढे सरकत बंगालच्या उपसागराकडे जात आहे.
आंध्र प्रदेशजवळही कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. आंध्र प्रदेशच्या आसपासही एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, ज्यामुळे दक्षिणेकडील व मध्य भारतातील हवामान प्रभावित होत आहे. या दोन कमी दाबाच्या पट्ट्यांच्या एकत्रित प्रभावामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कधी ऊन तर कधी मुसळधार पाऊस अशी स्थिती निर्माण झाली आहे. मान्सूनचा प्रवास लांबणीवर पडला आहे.
advertisement
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये ५ ऑक्टोबरपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज आहे. कोकण किनारपट्टीवर पावसाचा सर्वाधिक जोर राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र: पुणे, सातारा आणि नाशिकसह या भागातही जोरदार हजेरी लागेल. विदर्भ आणि मराठवाडा या दोन विभागांच्या काही भागांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
वादळात रूपांतर होण्याची शक्यता
सध्याच्या कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता पुढील ४८ तासांत कशी वाढते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जर हे दोन्ही कमी दाबाचे पट्टे अधिक तीव्र झाले, तर त्यांचे वादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. यामुळे वातावरणात मोठे बदल घडून येऊन अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
advertisement
रेड अलर्ट नाही, पण सतर्क राहा
सध्या राज्याच्या कोणत्याही जिल्ह्यासाठी रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आलेला नाही, ही एक दिलासादायक बाब आहे. मात्र, हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की, जर कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढली, तर पुढील ४८ तासांत रेड अलर्ट जारी केला जाण्याची शक्यता आहे.
म्हणूनच, नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनेनुसार योग्य ती खबरदारी घ्यावी आणि पुढील काही दिवस सतर्क राहावे. संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस राहणार असल्याने शेतीच्या कामाचे नियोजन जपून करणे आवश्यक आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 30, 2025 7:05 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अरबी समुद्रातून घोंगावतंय संकट! 48 तास राज्यासाठी महत्त्वाचे, हवामान विभागाने दिली महत्त्वाचे माहिती