'जेव्हा घाणेरडे रील...', सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवर स्पष्टच बोलली मायरा वैकुळ, सांगितला AI चा भयानक अनुभव

Last Updated:
Myra Vaikul : नुकत्याच एका कार्यक्रमात मायराने वाईट कमेंट्सबद्दल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे होणाऱ्या फसवणुकीबद्दल स्पष्टपणे तिचं मत मांडलं आहे.
1/8
मुंबई: मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेली आणि आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांची लाडकी बनलेली बालकलाकार मायरा वायकुळ सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ आणि ‘नीरजा: एक नयी पहचान’ मधून मायरा प्रेक्षकांच्या भेटीस आली.

advertisement
2/8
मात्र, सोशल मीडियावर सक्रिय असल्याने तिला अनेकदा ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतं. नुकत्याच एका कार्यक्रमात मायराने या वाईट कमेंट्सबद्दल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे होणाऱ्या फसवणुकीबद्दल स्पष्टपणे तिचं मत मांडलं आहे.

3/8
नुकतंच एका पॉडकास्टमध्ये मायराने हजेरी लावली होती. यावेळी तिला ट्रोलिंगबद्दल विचारलं असता, मायराने खूप समजूतदारपणे उत्तर दिलं.

4/8
ती म्हणाली, “कमेंट्स मला खूप येतात. मी मुद्दाम वाचत नाही, पण रील पाहताना कमेंट्सही दिसतात. अनेक कमेंट्स वाईट असतात, पण आपण आपलं काम मनापासून केलं ना, तर त्या कमेंट्सचं काहीच वाटत नाही.”

5/8
आपल्या आणि इतरांच्या आवडीनिवडी कशा वेगळ्या असू शकतात, हे सांगताना ती म्हणाली, “मला गोड आवडतं, पण ते समोरच्याला आवडेलच असं नाही. प्रत्येकाची चॉईस वेगळी असते. पण कधीकधी खूप घाणेरडे रील किंवा कमेंट्स पाहिल्यावर मात्र मनात येतं की, हे सोशल मीडियावर काय चाललंय!”

6/8
आजकाल सोशल मीडियावर AI मुळे जे बदल होत आहेत, त्यावरही मायराने तिचं मत मांडलं. AI मुळे होणारी फसवणूक आणि गोंधळ तिला खूप भयानक वाटतो.

7/8
ती म्हणाली, “माझी मावशी आणि मी साडीतले काही सुंदर फोटो काढले आहेत, पण हे जे काही ‘AI’ च्या माध्यमातून येत आहे ना, ते सगळं खूप भयानक आहे!”

8/8
एक अनुभव सांगताना ती म्हणाली, “मी नुकताच एक व्हिडिओ पाहिला, ज्यात एका मुलीने फुल स्लिव्ह्जचा सलवार कमीजमधील फोटो AI ला दिला. AI ने तिचा साडीतील फोटो दिला, पण त्यात तिची स्लीव्हलेस बाही समोर आली आणि तिच्या हातावरचा तीळही स्पष्ट दिसत होता. म्हणजे हे खरंच स्कॅम आहे आणि खूप भयानक आहे.”

Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement