उत्तरेकडून आलेल्या थंड वाऱ्यांनी बदललं हवामान, सावधान! पुढचे ३ दिवस महाराष्ट्रात आणखी थंडी वाढणार
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मुंबईसह महाराष्ट्रात थंडीची लाट, तापमानात मोठी घट. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट, दक्षिणेकडे मुसळधार पाऊस व ऑरेंज अलर्ट. शशिकांत मिश्रा यांनी माहिती दिली.
मुंबई: मागच्या 24 तासांत हवामानात मोठे बदल झाले आहेत. थंडीची लाट उत्तरेकडील आणि महाराष्ट्राशेजारील राज्यात आली आहे. हाडं गोठवणारी थंडी पडली आहे. आणखी २-३ डिग्रीने तापमान खाली घसरण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर 5 डिग्रीने तापमानाचा पारा खाली घसरला आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. थंडीचा कडाका येत्या काही दिवसांत आणखी वाढणार आहे.
मुंबईसह उपनगरातही रात्रीपासून थंडी वाढली आहे. पहाटेपासून थंड वारे वाहात आहेत. गुलाबी थंडीची मजा घेण्यासाठी लोक मॉर्निंग वॉकला निघाले आहेत. येत्या 3 दिवसात तापमान आणखी घसरणार त्यानंतर कोणतेही बदल होणार नाहीत. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील विदर्भ आणि मध्य प्रदेश इथे तापमान घसरणार आहे. तर दक्षिणेकडे सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस राहील. 17 ते 22 नोव्हेंबरदरम्यान पाऊस राहणार आहे. ऑरेंज अलर्ट तिथे अनेक ठिकाणी देण्यात आला आहे.
advertisement
हवामान तज्ज्ञ शशिकांत मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर केरळच्या किनारपट्टीजवळ सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे समुद्र खवळला असून त्याचा परिणाम दक्षिणेकडील राज्यांमध्ये दिसून येणार आहे. आज मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तापमानाचा पार खाली येणर असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 18 तारखेला वातावरणात थोडी सुधारणा होण्याची शक्यता आहे.
advertisement
हवामान तज्ज्ञ शशिकांत मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. सध्या पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. यावेळी थंडी वाढल्याने उबदार कपड्यांचे मार्केटही वाढले आहे. उबदार कपड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आली आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट कायम आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला. मुंबईत देखील किमान तापमानात कमालीची घट झाली आहे. मुंबईत किमान तापमान १६ अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहिल. कोंकणातही थंडीची चाहूल लागली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 17, 2025 7:07 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
उत्तरेकडून आलेल्या थंड वाऱ्यांनी बदललं हवामान, सावधान! पुढचे ३ दिवस महाराष्ट्रात आणखी थंडी वाढणार


