१० लाखांची लाच मागितली, ७ लाखांवर डील झाली, अन् ACB ची एन्ट्री, उपायुक्त रंगेहाथ सापडला
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Sangli Bribe Case: महापालिकेच्या उपायुक्तांनी १० लाखांची लाच मागितल्या प्रकरणी सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली आहे.
सांगली : लाच मागितल्याप्रकरणी सांगली महापालिकेचे उपायुक्त लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले. दहा लाखांची लाच मागितल्याप्रकरणी उपायुक्त वैभव साबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना ताब्यात घेतले आहे.
प्रकरण नेमके काय आहे?
सांगली महापालिका क्षेत्रातल्या एका २४ मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी उपायुक्त वैभव साबळे यांनी दहा लाखांची लाच मागितली होती. दहा लाखांची मागणी करून सात लाखांची रक्कमेवर तडजोड झाली होती.
परवान्यासाठी सात लाखांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संबंधित तक्रारदाराने तक्रार केली होती. तपासामध्ये सात लाखांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. उपायुक्त वैभव साबळे विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपायुक्त वैभव साबळे यांच्यावरील कारवाईनंतर महापालिका प्रशासनात खळबळ उडाली.
advertisement
गेल्या २ महिन्यांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईचा फास अधिक घट्ट केला आहे. राज्यभरातल्या अनेक विभागांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईचा धडाका लावला आहे.
view commentsLocation :
Sangli,Maharashtra
First Published :
June 09, 2025 7:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
१० लाखांची लाच मागितली, ७ लाखांवर डील झाली, अन् ACB ची एन्ट्री, उपायुक्त रंगेहाथ सापडला


