Accident News : ट्रॅक्टरवरचा ताबा सुटला अन् घात झाला, 28 वर्षीय तरूणाचा अपघाती मृत्यू, कुटुंबियांनी घरातील कर्ता पुरूष गमावला

Last Updated:

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत ट्रॅक्टरवरचा ताबा सुटल्याने पुलावरून कोसळून ट्रॅक्टरखाली दबून वाहनचालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

accident news
accident news
Accident News : रायगड : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत ट्रॅक्टरवरचा ताबा सुटल्याने पुलावरून कोसळून ट्रॅक्टरखाली दबून वाहनचालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संकेत रमेश बार्शी असे या 28 वर्षीय मृत तरूणाचे नाव होते. संकेतच्या वडिलांच्या काही वर्षापुर्वीच निधन झालं होतं.त्यामुळे घरातील संपूर्ण जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती.त्यामुळे घरातील कर्ता पुरूष गमावल्याने बार्शी कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
advertisement
कर्जत तालुक्यातील गौळवाडी गावाच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत मृत संकेत रमेश बार्शी हा तरूण गेली अनेक वर्षे स्थानिक मटेरियल सप्लाय करणाऱ्या वाहनांवर चालक म्हणून काम करीत होता.नेहमीप्रमाणे आज दुपारच्या सुमारास तो गौळवाडी येथून मांडवणेकडे ग्रीटने भरलेला ट्रॅक्टर घेऊन जात होता.
advertisement
या दरम्यान वैजनाथ नदीवरील मोन्या पुलाजवळ त्याचा ट्रॅक्टर वरील ताबा सुटला आणि तो अनियंत्रित होऊन पुलाच्या कठड्यावरून खाली कोसळला. यात दुर्दैवाने संकेतला बाहेर पडण्याची संधीच मिळाला नाही आणि ट्रॅक्टर ट्रोलीसह थेट त्याच्या अंगावर पडला त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
संकेत हा हुमगाव येथील रहिवाशी होता. संकेतच्या पश्चात त्याची आई असून त्याचे वडिलांची काही वर्षांपूर्वींच निधन झाले आहे त्यामुळे घराची जबाबदारी त्याच्यावरच होती. त्याच्या बहिणींची लग्ने झाली असून कुटुंबाचा आधार हरपल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संकेतच्या अश्या अकाली जाण्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्याचे नातेवाईक, गावातील तरुण, व त्यांचे मित्र या अपघाताने हदरून गेले असून ग्रामस्थांत शोककळा पसरली आहे.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वरोटे, पोलिस हवालदार अनिल वडते पोलीस हवालदार खाडे घटनास्थळी धाव घेत तत्काळ कार्यवाही सुरू करीत मृत संकेतचा मृतदेह ट्रॅक्टरखालून बाहेर काढीत कर्जत उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे शवविच्छेदना करिता आणण्यात आला आहे. या घटनेबाबत अधिक तपास कर्जत पोलीस करीत आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Accident News : ट्रॅक्टरवरचा ताबा सुटला अन् घात झाला, 28 वर्षीय तरूणाचा अपघाती मृत्यू, कुटुंबियांनी घरातील कर्ता पुरूष गमावला
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement