नांदेडमध्ये सिनेस्टाईल घटना, सूरजने पोलिसांवरच रोखली पिस्तुल; गोळीबाराने शहर हादरलं
- Published by:Sachin S
- Reported by:Mujeeb Shaikh
Last Updated:
अंधाराचा फायदा घेत आरोपी पसार झाला. त्याची गाडी पोलिसांनी जप्त केली.
नांदेड : नांदेडमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढतचं चाललं आहे. अशातच नांदेड शहरात पोलीस आणि आरोपीमध्ये थरारक घटना घडली. आरोपीला पकडण्यासाठी पोलीस गेले होते. पण तेव्हा गुन्हेगाराने पोलिसांवर पिस्तुल ताणली. पोलिसांनी गोळीबार केला मात्र आरोपी पसार झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील कौठा भागात ही घटना घडली. रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आणि पोलिसाना हवा असलेला सुरज सिंह गाडीवाले हा नांदेड शहरातील कौठा परिसरात आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कौठा परिसरात पोहोचले. सराईत गुन्हेगार सूरज सिंघ सूरज कारमधून आला. मात्र पोलीस आल्याची त्याला कुणकुण लागली आणि त्याने गाडी पळवली.
advertisement
एलसीबीच्या पथकाने पाठलाग केला. तेव्हा आरोपी सूरज सिंघ गाडीवाले याने आपल्या जवळील गावठी पिस्टल काढली. त्याला उत्तर म्हणून पोलिसांनी फायरिंग केली. अंधाराचा फायदा घेत आरोपी पसार झाला. त्याची गाडी पोलिसांनी जप्त केली. पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली. आरोपीचा शोध सुरू आहे. आरोपी सुरज गाडीवाले हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. त्याचे कुख्यात दहशतवादी हरविंदर सिंग रिंदा सोबत संबंध असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
August 23, 2025 11:55 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नांदेडमध्ये सिनेस्टाईल घटना, सूरजने पोलिसांवरच रोखली पिस्तुल; गोळीबाराने शहर हादरलं