दाभोळकर हत्या प्रकरणात निर्दोष मुक्तता, आता श्रीकांत पांगारकरांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Last Updated:

डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या आणि नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातील एटीएसने कारवाई केलेल्या श्रीकांत पांगारकर याने शिंदेंच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे

(श्रीकांत पांगारकर )
(श्रीकांत पांगारकर )
रवी जयस्वाल, प्रतिनिधी
जालना : दाभोळकर हत्या प्रकरणात निर्दोष मुक्तता झालेल्या श्रीकांत पांगारकरचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या हस्ते पांगारकरचा प्रवेश होणार आहे. दाभोळकर हत्या आणि नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी एटीएसने केली होती कारवाई केली होती. सनातनी आणि कट्टर हिंदुत्ववादी अशी पांगारकरची ओळख आहे.
डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या आणि नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातील एटीएसने कारवाई केलेल्या श्रीकांत पांगारकर याने शिंदेंच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. जालन्याचे शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या हस्ते पांगारकर याने प्रवेश केला आहे. जालन्यातील राणा ठाकूर यांच्या रेवगावच्या फार्म हाऊसवर मराठवाड्यातील चार तरुणांना पिस्तुल चालवणे आणि गावठी बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण दिल्याची आणि नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी रसद पुरवल्याचा आरोप पांगारकरवर आहे.
advertisement
या प्रकरणी न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली होती. आज श्रीकांत पांगारकर याने अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. सनातनी आणि कट्टर हिंदूवादी म्हणून श्रीकांत पांगारकर याची ओळख आहे. पांगारकर याने शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर जालना विधानसभा प्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दाभोळकर हत्या प्रकरणात निर्दोष मुक्तता, आता श्रीकांत पांगारकरांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
Next Article
advertisement
ZP Election Maharashtra: महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत जिल्हा परिषद निवडणुकीचा धुरळा, मतदान कधी? मोठी अपडेट...
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत जिल्हा परिषद निवडणुकीचा धुरळा, मतदान कधी? मोठी
  • नगर परिषद, नगर पालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता महापालिका निवडणुकीची रणधुमाळी

  • दुसरीकडे जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचाही धुरळा लवकरच उडणार असल्याचे वृत्त समोर

  • महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होणार अ

View All
advertisement