Maharashtra Elections 2024 : ठाकरे गटाकडून कोणत्या शिलेदारांना संधी? कामाला लागण्याच्या सूचना, संभाव्य उमेदवारांची यादी समोर!
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
शिवसेना ठाकरे गटाने आपल्या काही शिलेदारांना निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना केल्याची माहिती आहे. शिवसेना ठाकरे गटाची संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे.
प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली : एका बाजूला महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबत चर्चा सुरू असताना दुसरीकडे आता शिवसेना ठाकरे गटाने आपल्या काही शिलेदारांना निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना केल्याची माहिती आहे. शिवसेना ठाकरे गटाची संभाव्य यादी समोर आली आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात जागा वाटपाबाबत 250 जागांवर सहमती झाली असल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मित्रपक्षांना किती जागा सोडण्यात येणार, याबाबतही ठोस निर्णय झाला नसल्याची माहिती आहे.
मविआमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच!
विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. मात्र अद्याप महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर झालेले नाही. मात्र तिन्ही पक्षांमध्ये 250 जागांवर एकमत झाले आहे. जवळपास 25 जागांवर तोडगा निघाला नसून मित्रपक्षांच्या वाट्याला कोणत्या जागा द्यायच्या, यावर अद्याप निर्णय झालेला नाही. मुंबईत शिवसेना ठाकरे गट मोठा भाऊ असणार आहे. तर, पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे सर्वाधिक जागा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेस विदर्भात सर्वाधिक जागांवर लढवणार असून काही जागांबाबत शिवसेना ठाकरे गटासोबत वाद असल्याची चर्चा आहे.
advertisement
या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. यातील काही उमेदवारांना निवडणुकीच्या प्रचाराला लागण्याची सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.
>> मुंबईतील संभाव्य आमदार
> आदित्य ठाकरे - वरळी
> सुनील राऊत - विक्रोळी
> सुनील प्रभू - दिंडोशी
> अजय चौधरी - शिवडी
> ऋतुजा लटके - अंधेरी पूर्व
advertisement
> संजय पोतनीस - कलिना
> प्रकाश फातर्पेकर - चेंबुर
> रमेश कोरगांवकर - भांडुप पश्चिम
>> मुंबईबाहेरील उमेदवार कोणते?
राजन साळवी - राजापूर (रत्नागिरी)
> भास्कर जाधव - गुहागर (रत्नागिरी)
> वैभव नाईक - कुडाळ (सिंधुदुर्ग)
> नितीन देशमुख - बाळापूर (अकोला)
> कैलास पाटील - उस्मानाबाद (धाराशिव)
> उदयसिंह राजपूत - कन्नड (छत्रपती संभाजीनगर)
> राहुल पाटील - परभणी (परभणी)
advertisement
इतर महत्त्वाची बातमी:
view comments
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 18, 2024 12:08 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Maharashtra Elections 2024 : ठाकरे गटाकडून कोणत्या शिलेदारांना संधी? कामाला लागण्याच्या सूचना, संभाव्य उमेदवारांची यादी समोर!









