Water Bottle : 20 रुपयाची पाण्याची बाटली, तुम्ही जे पीत आहात, ते नैसर्गिक मिनरल वॉटर आहे की शुद्ध केलेलं साधं पाणी?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तुम्ही जे ₹20 देऊन विकत घेताय, ते तांत्रिकदृष्ट्या 'नैसर्गिक मिनरल वॉटर' नसतं. आपण ज्याला वर्षानुवर्षे मिनरल वॉटर समजत आलो आहोत, ते प्रत्यक्षात काय आहे? हा केवळ एक भाषिक गोंधळ आहे की ग्राहकांची होणारी दिशाभूल? या प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधणार आहोत.
प्रवास असो, उन्हाचा तडाखा असो किंवा एखादं हॉटेल; तहान लागली की आपला हात सर्वात आधी पाण्याच्या बाटलीकडे जातो. आपण सहजपणे दुकानात जाऊन "एक मिनरल वॉटर द्या" असं म्हणतो आणि दुकानदार आपल्याला 'बिस्लेरी' किंवा तशाच स्वरूपाची एखादी बाटली देतो. आपणही ₹20 देतो आणि 'मिनरल वॉटर' पितोय या समाधानात पाणी पितो.
advertisement
advertisement
बिस्लेरी 'मिनरल वॉटर' नाही?सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करून घेऊया खुद्द बिस्लेरी किंवा इतर मोठे ब्रँड्स कधीच असा दावा करत नाहीत की ते 'नॅचरल मिनरल वॉटर' विकत आहेत. जर तुम्ही बाटलीवरील लेबल नीट वाचलं, तर तिथे स्पष्टपणे 'Packaged Drinking Water' असं लिहिलेलं असतं. आपण ग्राहक म्हणून 'ब्रँड नेम' आणि 'पाण्याचा प्रकार' यात गल्लत करतो.
advertisement
advertisement
1. पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर (Packaged Drinking Water)हे तेच पाणी आहे जे आपण प्रवासात ₹20 ला विकत घेतो. हे पाणी नळ, विहीर किंवा कोणत्याही सार्वजनिक जलस्रोतातून घेतले जाऊ शकते.या पाण्यावर RO (Reverse Osmosis), डिस्टिलेशन आणि क्लोरीनेशन यांसारख्या अनेक प्रक्रिया केल्या जातात. या प्रक्रियेत पाण्यातील हानिकारक बॅक्टेरिया तर मरतातच, पण सोबतच नैसर्गिक खनिजेही नष्ट होतात.पाणी पिण्यायोग्य आणि चवदार बनवण्यासाठी त्यात नंतर मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखी खनिजे कृत्रिमरीत्या (Artificially) मिसळली जातात.ब्रँड्स: बिस्लेरी, किन्ले, ॲक्वाफिना, रेल नीर हे सर्व याच श्रेणीत येतात.
advertisement
2. नॅचरल मिनरल वॉटर (Natural Mineral Water)हे पाणी खऱ्या अर्थाने 'मिनरल वॉटर' असते. हे पाणी थेट जमिनीखालून, नैसर्गिक झऱ्यातून किंवा हिमालयासारख्या सुरक्षित नैसर्गिक स्त्रोतातून काढले जाते. या पाण्यावर कोणतीही रासायनिक प्रक्रिया किंवा RO केला जात नाही. केवळ गाळणी आणि निर्जंतुकीकरण केले जाते. यात खनिजे नैसर्गिकरीत्याच असतात. ते कृत्रिमरीत्या मिसळण्याची गरज नसते. हे पाणी महाग असते. याची किंमत साधारणपणे ₹50 पासून सुरू होऊन ₹150 किंवा त्याहूनही अधिक असू शकते. (उदा. हिमालयन, केल्झाई, एव्हियन).
advertisement
advertisement
advertisement







