IPL 2026 Auction : पृथ्वी ते सरफराज... कसेबसे वाचले 5 खेळाडू, नाहीतर संपलं होतं करिअर!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 च्या लिलावामध्ये काही खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंचं करिअर वाचलं आहे. 5 भारतीय खेळाडूंना लिलावात बेस प्राईजवर विकत घेतल्यामुळे त्यांना नवी लाईफलाईन मिळाली आहे.
advertisement
advertisement
टीम इंडियातून बाहेर असलेल्या सरफराज खानला सीएसकेने लाईफलाईन दिली आहे. लिलावाच्या काही तास आधी सरफराजने 22 बॉलमध्ये 73 रनची वादळी खेळी केली. पृथ्वी प्रमाणेच सरपराजवरही सुरूवातीला कुणी बोली लावली नाही, पण शेवटच्या राऊंडमध्ये सीएसकेने त्याला 75 लाखांना टीममध्ये घेतलं. सरफराजने शेवटचा आयपीएल सामना 2023 साली दिल्लीकडून खेळला होता.
advertisement
राहुल त्रिपाठीसाठी केकेआरने 75 लाख रुपये मोजले. 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये हैदराबादने त्रिपाठीला टीममध्ये घेतलं, पण खराब कामगिरीनंतर हैदराबादने त्याला रिलीज केलं. 2025 मध्ये सीएसकेने राहुल त्रिपाठीवर बोली लावली, पण तिथेही त्याची कामगिरी निराशाजनक झाली. 5 सामन्यांमध्ये त्रिपाठीने 11 च्या सरासरीने 55 रन केले. सीएसकेने त्याला 3 कोटी 40 लाखांना विकत घेतलं होतं.
advertisement
advertisement











